Shivajirao Adarrao Patil - News Express Marathi

‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’साठी पाठपुरावा करणार!
आमदार महेश लांडगे यांच्या आग्रही मागणीला प्रतिसाद

पिंपरी । पिंपरी-चिंचवडमधील ‘रेड झोन’चा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. अनेकदा बैठक झाली. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही सकारात्मक भूमिका घेतली होती. पण, हा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार होतील. त्यामुळे  ‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’ करण्यासाठी आम्ही पुन्हा संरक्षण विभाग आणि प्रधानमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत आणि हा प्रश्न सोडवणार आहोत, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त भोसरी येथील गावजत्रा मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी फडणवीस बोलत होते.

आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भाषणात ‘रेड झोन’ बाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले. फडणवीस यांच्या सहकार्यामुळे शहरातील शास्तीकर, उपयोगकर्ता शुक्ल, कचरा प्रक्रिया प्रकल्प, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, समाविष्ट गावांचा विकास, आंद्रा, भामा आसखेड पाणी प्रकल्प आदी ‘भोसरी व्हीजन-२०२०’मधील सर्व महत्वपूर्ण विषय मार्गी लागले. मोदी सरकार धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जाते. हा प्रश्न तुम्हीच सोडवू शकता त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची ‘रेड झोन’ची मुक्तता करावी, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले.

दरम्यान, २०१४ मध्ये राज्यात भाजपा प्रणित सरकार स्थापन झाल्यापासून भोसरीतील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या-ज्या वेळी जाहीर सभा केल्या. आमदार लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांचे प्रश्न आणि मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. त्या  सभांमध्ये दिलेल्या सर्व आश्वासनांची त्यांनी पूर्तता केलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा याच मैदानावर फडणवीस यांनी ‘रेडझोन’बाबत पिंपरी-चिंचवडकरांना आश्वासित केले आहे. त्यामुळे रेडझोनमधील मिळकतधारक, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिक अशा २ लाख पिंपरी-चिंचवडकरांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे २ लाख मिळकतधारक, लघु व मध्यम उद्योजक यांना दिलासा देण्यासाठी ‘रेड झोन’ हद्द कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार महेश लांडगे यांनी ‘रेड झोन मुक्त पिंपरी-चिंचवड’ची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे.  ‘रेड झोन’चा तिढा सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी संरक्षण विभाग आणि मोदी सरकार निश्चितपणे सकारात्मक भूमिका घेणार आहे.

- शिवाजीराव आढळव पाटील.

आढळराव पाटील गुरुवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज, महायुतीचे दमदार शक्तिप्रदर्शन..!
पुणे : पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी जाहीर सभा शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय (ए) महायुतीच्या वतीने शिवाजीराव आढळराव पाटील गुरुवारी (23 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल आहेत. याचबरोबर पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानुसार उद्या महायुतीकडून पुण्यात मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे.

शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या २९ एप्रिल संध्याकाळी पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी जाहीर सभा घेणार आहेत.  या सभेपुर्वी नरेंद्र मोदी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. हे दोन्ही मोठे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या सभा आयोजित केल्या आहेत.  त्याच पार्श्वभूमीवर महायुतीची आज पुण्यात बैठक पार पडली.

महायुतीची बैठक संपल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, गेल्या अनेक दिवसापासून महायुतीचा प्रचार सुरू केला आहे. यापुढे आता प्रचाराची पद्धत काय असावी, तसेच उद्या शिरूरसह पुण्याचे उमेदवार मुरलिधर मोहोळ यांच्यासह सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहोत. त्याच अनुषंगाने आज बैठक पार पडली. तसेच यापुढे आता महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रचाराची पद्धत काय असावी यासंदर्भात बैठकीत चर्चा केल्याची माहिती आढळराव पाटलांनी दिली.

तर गेल्या महिन्याभरापासून मतदारसंघाची परिस्थिती पाहता सगळ्याच मतदारसंघातून राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे तिन्ही प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते हातात हात घालून काम करीत आहेत. यातच आता मनसेचा देखील समावेश झाल्याने मनसेचे कार्यकर्ते देखील मोठ्या उत्साहाने प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत. तर उद्या सकाळी आम्ही उमेदवारी अर्ज सादर करणार आहोत. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासह चंद्रकांत पाटील देखील उपस्थित राहणार असल्याचे आढळरावांनी सांगितलंय.

आढळरावांनी यावेळी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर देखील टिकास्त्र सोडलं. गेले अनेक दिवस पाहतोय की, विद्यमान खासदाराला गावाच्या वेशीवरून हाकललं जात आहे. आमच्या गावातल्या सरपंचाच देखील त्यांनी फोन उचलला नाहीय. त्यांनी तर २२ निवेदन दिलीत पण त्यावर एकावरही कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांना गावाच्या बाहेर हाकलून लावण्याचा प्रकार आता दिवसेंदिवस वाढत आहे. असं म्हणत आढळरावांनी कोल्हेंवर जहरी टिका केली.

दरम्यान,  निवडून आल्यानंतर लोकांची कामे करायची नाहीत. नुसतं सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्टिवेशन प्रचार करायचा. एक आभासी वातावरण निर्माण करायचं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचं नाही. फक्त लोकांच्या जीवावर निवडून यायचं. काम करायची नाहीत. परंतु जनता आता भोळी नाही आहे. जनतेला सगळं कळतंय. असं म्हणत आढळरावांनी कोल्हेंवर जोरदार घणाघात केला.