Shivaji Adarrao Patil - News Express Marathi

शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद
हडपसर : शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांच्या सूनबाई माधुरी अक्षय आढळराव यांनी हडपसर मतदार संघात विविध ठिकाणी भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता हडपसर विधानसभा मतदार संघातून शिवाजीराव अढळराव पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळेल, असा विश्वास माधुरी आढळराव यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते अभिजीत बाबर, राष्ट्रवादीच्या नम्रता गोंदळ, रिपाइंच्या सरिता कुंभार, सरिता सोनवणे, छाया बोरूडे, राणी वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी माधुरी अक्षय आढळराव यांनी ससाणे नगर येथील रिपबलिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली. तसेच ससाणे नगर येथील स्वामी समर्थ अपार्टमेंटच्या वतीने त्यांचा स्वामींची मूर्ती देवून स्वागत करण्यात आले.

यावेळी माधुरी अढळराव म्हणाल्या, आम्ही घरोघरी जावून शिवाजीराव अढळराव पाटील यांचा प्रचार करीत आहोत. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. हडपसर भागात महिलांचे प्रश्न, लाईट, पाणी, रास्ते, वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे.  या अनेक प्रश्नांवर पुढील काळात काम करण्याची गरज आहे.

अभिजीत बाबर म्हणाले, विकासासाठी आपल्या शिरूर लोकसभा मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचां खासदार निवडून देणे गरजेचे आहे. मागच्या वेळी चूक झाली. संभाजी महारांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला जनतेने निवडून दिलं. या खासदारांनी गेल्या पाच वर्षात एकाही कार्यकर्त्यांने कोणाचाही फोन उचलला नाही. जो काही निधी आणला तो शिवाजीराव अढळराव पाटील यांनी आणला. शिरूर लोकसभा मतदार संघात तब्बल 700 गांव आहेत. अन् अस एकही गांव नाही जिथे आढळराव यांचा निधी पोहोचलेला नाही. त्यामुळे यंदा शिवाजीराव अढळराव पाटील हेच विजयी होणार, असा आशावाद बाबर यांनी व्यक्त केला.

भोसरीमधील बाईक रँलीत तरुणांचा मोठा सहभाग
भोसरी : महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभा मतदार संघात रँली काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात शिवाजीदादा यांचे स्वागत करण्यात आले. रँलीमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसत होता. महिला व तरुणींनी आढळराव पाटील यांचे औक्षण केले. युवक-युवतींनी शिवाजीदादा यांच्यावर पुष्पवृष्टि केली. यावेळी मोठ्या उत्साहात घोषणाबाजी करण्यात आली. श्री साई द्वारकामाई सेवा समिती देवस्थान येथे दर्शन घेत भोसरी येथील नेहरुनगरमधील हाँकी स्टेडियम येथून रँलीस सुरवात करण्यात आली. उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विविध पदाधिकारी व नागरिकांच्या घरी भेट देत संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात उमेदवार आढळराव पाटील यांचे स्वागत केले.

भोसरी व शहर परिसरातील नेहरूनगर, अजमेरा-मासुळकर काँलनी क्रांती चौक, मयूर पॅरानोमा, झाकीर हुसेन चौक, नेहरूनगर येथील गणेश मंदिर तसेच चिखली व पाटीलनगर, तळवडे गावठाण व गाव, रुपीनगर, सीएनजी चौक, आळंदी रोड, छत्रपती शिवाजी चौक, ज्योतिबा नगर तळवडे, त्रिवेणीनगर आदी परिसरातही आढळराव पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. येथील गणेश मंदिरात दर्शन घेऊन तसेच शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रँलीस सुरवात करण्यात आली. परिसरातील विविध ठिकाणी महिलांनी औक्षण करुन तसेच फुले उधळून रँलीचे जोरदार स्वागत केले.शहरातील विविध ठिकाणी महिलांनी मोठ्या उत्साहात व आनंदाने शिवाजीदादा यांचे स्वागत केले. प्रत्येक ठिकाणी महिला रँलीला थांबवत औक्षण करुन स्वागत करताना दिसत होत्या. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे जेसीबीतून फुले उधळून मोठ्या उत्साहात स्वागत केले.

दरम्यान, यावेळी रँलीत महिला, तरुण-तरुणी यांचा मोठा सहभाग होता. अबकी बार, चारसो पार, एकच वादा शिवाजी दादा, जनतेचा पक्का निर्धार, शिवाजीदादाच खासदार, येऊन येऊन येणार कोण, शिवाजीदादांशिवाय आहेच कोण..अशा प्रकारच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला.सर्व ठिकाणचे नागरिक तुम्हालाच मतदान करण्याची ग्वाही देताना दिसत होते. पुण्याच्या माजी महापौर वैशाली बनकर यांच्या निवास्थानी आढळराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच महायुतीमधील अनेक पदाधिकारी व नेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयास आढळराव पाटील यांनी भेट देत संवाद साधला. युवकांचा बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता. दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है असे नारे यावेळी युवकांनी दिले.

चिखली व तळवडे परिसरात रँली काढण्याच्या अगोदर उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांना अभिवादन केले. ग्रामदैवतांचे दर्शन घेत रँलीस सुरवात केली. दरम्यान, या रँलीत महिला, तरुण-तरुणी यांचा मोठा सहभाग होता. यावेळी महिलांनी 'अबकी बार, चारसो पार' शिवाजी दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, 'एकच वादा, शिवाजी दादा' अशी घोषणाबाजी केली.

यावेळी महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, कार्यसम्राट आमदार महेश लांडगे, शिवसेनेचे कामगार नेते इरफानभाई सय्यद, माजी महापौर वैशालीताई घोडेकर, राहुल जाधव, राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राहुल भोसले, माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, युवा नेते य़श दत्ताकाका साने, किसन बावकर, दिनेश यादव, माजी नगरसेवक विकास साने, चिंतामण भालेकर, माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, धनंजय भालेकर, रवींद्र आप्पा सोनवणे, माजी नगरसेविका संगीता नाणी ताम्हण, पांडा भाऊ भालेकर, गोपाळ तात्या भालेकर, धनंजय वर्णेकर, शरद भालेकर, विशाल मानकर, संगीता देशमुख, रघुनंदन घुले, अस्मिता भालेकर, अनिल भालेकर,  खंडू भालेकर, सुनिल भालेकर, रमेश भालेकर, नवनाथ महाराज भालेकर, विलास भालेकर, विजय दिघे, पांडुरंग तात्य भालेकर, अमित भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर, माजी नगरसेवक गीता ताई मंचरकर, शहर उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, संयोजक विजय फुगे, रवींद्र नांदुरकर, फारुख भाई इनामदार आदी महायुतीमधील घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी सहभागी झाले.

कणखर आढळराव पाटील चिमुकल्याच्या शुभेच्छांनी झाले भावुक..!
पुणे : पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ सक्रिय राजकारणात असणारे त्याचबरोबर एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून जनतेने निवडून दिलेले कणखर व कट्टर नेतृत्व म्हणून शिवाजी आढळराव पाटील यांना महाराष्ट्र ओळखतो. त्याच जोरावर ते यंदाची शिरूर लोकसभेची निवडणूक पुन्हा लढवत आहेत.

एक अभ्यासू, कणखर, आक्रमक, कृतिशील खासदार म्हणून शिवाजी आढळराव पाटील यांनी आजवर काम केले आहे, त्यातच नुकतेच निवडणूक प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने लौकी येथे देशाचे रक्षण करताना शहीद झालेले वीर जवान स्व. सुधीर पंढरीनाथ थोरात यांचा चिरंजीव कु. यश सुधीर थोरात या चिमुकल्याने आढळराव पाटील यांना लेखी पत्राद्वारे दिलेल्या शुभेच्छांनी कणखर मनाचे आढळराव देखील भावुक झाले..

मा. श्री. शिवाजीदादा आढळराव पाटील
शहिद जवान माझे पप्पा स्व. सुधीरजी पंढरीनाथ थोरात, देशाचे रक्षण करत असताना त्यांना वीरमरण आले. आपण एक कुटुंबप्रमुख म्हणून तुम्ही आमच्या सोबत राहिलात आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत, तुम्हाला जनतेची सेवा करण्याची पुन्हा संधी मिळो.
वंदे मातरम
Best of luck आजोबा..!
अशा शब्दांत यश थोरात या चिमूकल्याने आढळराव पाटील यांना लेखी शुभेच्छा दिल्या.

यावेळी 'शिवाजीदादा खरच मोठ्या भावाप्रमाणे माझ्या मागे उभे राहिले, माझ्यावर माझ्या कुटुंबावर ज्यावेळी वेळ होती त्या वेळी मला भावासारखा आधार दिला हे मी कधी विसरू शकत नाही अशी भावना वीर माता सौ. कौसल्या पंढरीनाथ थोरात यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांसह शिवाजीराव आढळराव पाटील भावनिक झाले. जनतेचं हे प्रेम व आपुलकी पाहून मन गहिवरून आले, माझ्या जनतेचे हेच प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी लढण्याची ऊर्जा देत राहते. यापुढे यशच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी माझी असा शब्द त्यांनी यावेळी वीरमाता कौसल्या थोरात यांना दिला.