Shivajirao Adharao Patal - News Express Marathi

`महायुती’च्या उमेदवारांच्या पथ्यावर शरद पवारांचा सेल्फ गोल!
`पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एका गटाचे नेते शरद पवार  यांनी वादग्रस्त विधान करून सेल्फ गोल मारून घेतला आहे. या निवडणुकीनंतर छोटे-छोटे पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील, या त्यांच्या निवेदनानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा मानला जात आहे की शरद पवार यांचा गट हा तर कॉंग्रेसमध्ये जाईलच पण जाताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटालाही घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीचे उमेदवार मात्र खुश झाले आहेत.

शिरुर मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाचे डॉ. अमोल कोल्हे  यांच्या विरोधात लढत असलेले शिवाजीराव आढळराव तसेच मावळमध्ये उबाठा गटाच्या विरोधात लढत असलेले श्रीरंग बारणे यांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातील महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांनाही अर्थातच शरद पवार यांच्या या उद्‌गाराचे होकारात्मक पडसात जाणवतील.

गेल्या आठवड्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले होते की दि. ४ जूनच्या निकालानंतर महाराष्ट्रातील दोन राजकीय पक्ष पूर्णपणे संपतील. या त्यांच्या भाकितानंतर लगेचच शरद पवार यांनी जे उद्‌गार काढले ते देखील धक्कादायक मानले जातात. ते दोन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील शरद पवार यांचा गट  आणि शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांचा गट हे स्पष्ट झाले आहे.

शरद पवार यांनी हा खुलासा करताना आपल्याबरोबर उद्धव ठाकरे यांचा गटही  येईल, असेही सांगून टाकले असल्याने शिवसेनेच्या उबाठा गटात एकच खळबळ उडाली आहे.

एकीकडे महायुतीचा झंझावाती प्रचार आणि दुसरीकडे विरोधकांची उडणारी धूळधाण पाहता आणि पुणे जिल्ह्यापुरता विचार करता शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे आणि मुरलीधर मोहोळ या उमेदवारांना अनुकूल असेच
शरद पवार यांचे वक्तव्य मानले जाते.

दि.४ जूनच्या निकालानंतर देशातील छोटे प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील. असे झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचाही त्याला फारसा विरोध नसेल. आमची आणि कॉंग्रेसची विचारसरणी साधारण एकच असल्यामुळे हे सहज शक्य आहे. असे झाल्यास कॉंग्रेसचे नेते सुद्धा या भूमिकेचे स्वागतच करतील.
-  शरद पवार, ज्येष्ठ नेते

“भविष्यात निवडणूक लढेल की नाही, पण यावेळेला एक संधी द्या”, आढळराव पाटलांकडून मतदारांना भावनिक साद
पुणे : महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा उद्या थंडवणार आहेत. अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. भविष्यात निवडणूक लढेल की नाही, सांगता येत नाही. परंतु यावेळी मला काम करण्याची संधी द्या. जी कामे अपुर्ण राहिली आहे. ती पुर्ण करण्यासाठी तुमचे आशीर्वाद द्या. असे आढळरावांनी एका सभेत म्हटलंय.

मागील काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील जोरदार प्रचार करतांना दिसत आहे. यातच आता अजित पवारांच्या सभा देखील शिरूरमध्ये होत आहेत. तर महायुतीचे सर्वच नेते, स्थानिक पदाधिकारी, आढळरावांसाठी झपाटून काम करतांना दिसत आहेत. यातच शेवटच्या टप्प्यात आढळराव पाटलांकडून मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एका सभेत आढळराव पाटील म्हणाले की, खेड तालुक्यातील जनतेने मला पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून दिलं. याचं सगळं श्रेय खेड तालुक्याला जातं. खेड तालुक्यातील जनतेमुळे मी तिनदा खासदार झालो. ३० वर्षे मला या मतदारसंघात काम करताना तुम्ही पाहिले आहे. खेड तालुक्यासह शिरूर मतदारसंघातील कामे करण्यासाठी मला ताकद द्या. ही माझी शेवटची निवडणूक आहे”, असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटलांनी जनतेला भावनिक साद घातली आहे.

पुढे बोलतांना ते असेही म्हटले की, भविष्यात निवडणूक लढेल की नाही लढेल काही सांगता येत नाही. पण यावेळेला संधी द्या. आपल्या भागात जी कामं अपुर्ण राहिली ती पुर्ण करण्यासाठी सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. ही शिवरायांची भूमी आहे. क्रांतीकारांची भूमी आहे. ही शूरवीरांची भूमी आहे.  या भूमीतल्या वीराने एकदा निर्णय घेतला तर कोणाचे काय ऐकत नाही. त्यामुळे येणाऱ्या 13 तारखेला माझं चिन्ह घड्याळ आहे.  घड्याळ घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचा बटन दाबून मला विजयी करा. असे आवाहनही त्यांनी केले आहे.

भोसरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा
पिंपरी । शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीत उद्या (दि.१० मे) भोसरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  ‘विजयी संकल्प’ सभा होणार आहे. त्यानिमित्ताने महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही तोफ धडाडणार आहे.

भोसरी विधानसभेतील भाजपाचे आमदार आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचे भाजपा निवडणूक प्रमुख आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारसाठी जाहीर सभा आयोजित केली आहे.

भोसरी येथील गावजत्रा मैदानावर शुक्रवारी, दि. १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प सभा होणार आहे. या सभेला महायुतीचे सर्व घटकपक्ष, स्थानिक नेते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. ही सभा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी महायुतीकडून कंबर कसली आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना ३७ हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले होते. यावेळी आम्ही महायुतीची वज्रमूठ तयार केली असून, भोसरीतून १ लाख मतांचे लीड देण्याचा संकल्प केला आहे. शिरुरमधील विजयाची सुरूवात भोसरीतून होईल, असा विश्वास आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी शिरुर लोकसभा मतदार संघातून महायुतीचा खासदार निवडून देण्याचा संकल्प आहे. भोसरी मतदार संघ हा या निवडणुकीत निर्णायक राहणार असून, मतांची आघाडी घेण्याकरिता जनसंवाद बैठकांच्या माध्यमातून आम्ही तळागाळातील सर्व घटकांसोबत संवाद केला आहे. मोदी सरकारचे विकासाचे व्हीजन आणि कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत जनजागृती केली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदार संघातील सकारात्मक वातावरण पाहता महायुतीची ‘विजयी संकल्प’सभा यशस्वी होईल, यात शंका नाही.

- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, निवडणूक प्रमुख, शिरुर लोकसभा, भाजपा.

'सुप्रियाताई चतुर्थीला अन् अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात'; मिटकरींचा हल्लाबोल
शिरूर :  शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आघाडी घेतली आहे. 2018 साली मी आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसंपर्क यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र ढवळून काढला होता. मला मी त्यांच्या सोबत आहे यांचा प्रचंड अभिमान होता. मात्र हा व्यक्ती केवळ पैशाचा मागे लागलेला आहे, छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांची भूमिका करून त्यांना महाराजांचे विचार समजत  नाहीत, उद्या पैशांसाठी ही व्यक्ती बहलोल खानाचीही भूमिका करेल अशी जहरी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील  महायुतीचे  उमेदवार शिवाजी आढळराव पाटील  यांच्या प्रचारार्थ  कडुस येथील कोपरा सभेत मिटकरी बोलत होते.  यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले,  मी कोल्हे साहेबांचा फॅन होतो, त्यांच्या सोबत राहायचो मला अभिमान वाटायचा  मी ज्यांना शिवाजी महाराज, संभाजी महाराज समजले मात्र तो माणूस केवळ केळव जटा  वाढवून साधुचा आव आणणारा निघाला.  मी राज्यभर दौरे केले होते यांच्यासोबत त्यांनी मात्र  मला दिल्लीत दोन दिवस  भेटीसाठी ताटकळत ठेवले होते असेही मिटकरी यांनी सांगितले.  छत्रपतींची भूमिका करणाऱ्या माणसाने गड किलयांचे जतन करायचे की तिथे जाऊन लव्ह सॉन्ग शूट करायचे हे भान सुद्धा याला नाही अशा शब्दांत कोल्हेंवर टीका केली.

डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून निवडणूक भावनिक करण्याचा  प्रयत्न  केला जात आहे, त्याचा खरपूस समाचार मिटकरी यांनी घेतला, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थाळ तुमच्या गावाजवळ आहे, मात्र तूनही फक्त निवडून आले तेंव्हा गेलात, त्यानंतर डायरेक्ट प्रचारासाठी पाच वर्षांनी, त्यातही गडावर शिवाजीराव भेटले  तर कॅमेऱ्या समोर दादांचे दर्शन घेतले आणि त्या बातम्या चालवल्या, आमच्या समोर कोणतेही वडीलधारी व्यक्ती आली की आम्ही त्यांच्या पाया पडतो त्यात नवीन काय आहे,  एक मात्र मानले पाहिजे की शिवाजीरावांनी तुम्हाला पाया पडू दिले हा त्यांचा मोठेपणा आहे.

लोकसभा निवडणूक ही स्थानिक नाही तर ही देशाची निवडणूक आहे,  देशाच्या विकासाचा शक्तिशाली चेहरा म्हणून जग  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पहात  आहे यामुळे आपल्याला विकासाला साथ देण्यासाठी शिवाजीराव आढळराव यांना संयदेत पाठवायचे आहे, असेही मिटकरी यांनी नमूद केले.  डायलॉग बाजी आम्हालाही करता येते, संसदेत शेवटच्या सत्रात कांद्याची माळ गळ्यात घालून शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचा अभिनय केला, मात्र तुम्हाला ज्या कामासाठी संसदेत पाठवले होते तिथे पाच वर्षे काय झोपा काढल्या  का? असा सवाल उपस्थित करत आढळराव यांनी त्यांच्या तीन टर्म मध्ये केलेल्या कामाचा आढावा घेत मिटकरी यांनी आढळराव यांना विकासासाठी मते द्या  असे आवाहन  केले.  तसेच अक्षय आढळराव यांनी संरक्षण क्षेत्रावरील आरोपावरून कोल्हे यांची केलेली पोळखोल उत्तम असल्याचे मिटकरी यांनी म्हंटले.

अजित पवार यांनी निष्ठा सोडली या कोल्हे यांच्या आरोपांवर उत्तर देताना मिटकरी म्हणाले, तुम्ही मनसे मध्ये होता, मग शिवसेना नंतर अजित पवारांच्या आशीर्वादानेच राष्ट्रवादीत आलात आणि खासदार झालात. आज त्यांचीही साथ सोडून 84 वर्षांच्या पवार साहेबांना प्रचारासाठी येण्याची गळ घालता , यामुळे तुम्ही  निष्ठा या शब्दावर न बोलणेच अधिक चांगले. अमित शहा यांना तुम्ही का भेटले होता? गरुड झेप सिनेमासाठी खरंच घर गहाण ठेवले की सोशल मिडियावर सहानुभूमी मिळवण्याचा प्रयत्न केला असा  सवाल ही मिटकरी यांनी उपस्थित केला. तसेच सुप्रिया ताई चतुर्थीला आणि अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात असा आरोप केला.

रुग्णालयातील दिलीप वळसे-पाटील यांची शिवाजीराव आढळराव पाटलांकडून विचारपूस!
पुणे : शिरूरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात लोकसभेची निवडणुक होत आहे. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपला प्रचार धडक्यात सुरू केला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे देखील चांगलचे सक्रीय झाले आहेत. अशातच आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आढळराव पाटलांनी भेट घेऊन तब्येची विचारपुर केली आहे. काही दिवसांपुर्वी वळसे पाटलांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांची आढळराव पाटलांनी भेट घेतली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी गटातील आमदारांनी आढळरावांच्या प्रचारासाठी चांगल्याच बैठका सुरू केल्या आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून डाव्या मांडीचे हाड व डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे मंत्री दिलीप वळसे पाटील दवाखान्यात उपचार घेत होते. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. अशातच आता शिवाजीराव आढळराव पाटलांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची विचारपूस करण्यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपणा सर्वांना हे सांगताना अत्यंत समाधान वाटत आहे की, नामदार साहेबांची प्रकृती हळू हळू सुधारत आहे आणि लवकरच सक्रिय होऊन ते पुनः सगळा कार्यभार आपल्या हाती घेणार आहेत. जनतेच्या आशिर्वादाने हे सगळं लवकरच शक्य होईल असा विश्वास साहेबांनी व्यक्त केल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी शिवाजीराव आढळराव पाटलांच्यासोत माजी जिल्हापरिषद सदस्य अरूण गिरे, शिवाजी राजगुरू आदी उपस्थित होते.

'खासदार नसतानाही वाहतूककोंडी च्या प्रश्नासाठी तीनदा नितीन गडकरींना भेटलो '; आढळराव पाटील
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी काल वाघोली दौरा केला. या दौऱ्यात आढळराव पाटलांनी नागरिकांच्या गाठीभेट घेत आपल्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी वाघोलीमधील काही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आढळरावाचं जंगी स्वागत केले. त्यानंतर आढळरावांनी नागरिकांशी संवाद साधत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टिका केली.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक धरणे आहेत. १० वर्षापुर्वी वाघोली जेव्हा छोटी होती तेव्हा येथील पाण्यासाठी मनपाने एक योजना आखली होती.  जीचा खर्च २५ कोटी होता. त्यापैकी निम्मा निधि मनपा देणार होती तर निम्मा खर्च वाघोली ग्रामपंचायतीला द्यावा लागणार होता. मी मंत्रालयात जाऊन यावर बोललो. मात्र खासदाराविना मतदारसंघ अशी मागच्या काही वर्षांपासून शिरुन मतदारसंघाची ओळख आहे. पुढे काय होणार ? असा टोलाही त्यांनी लगावला.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, पुणे शहरातील ड्रेनेजच्या समस्यांवर फक्त अजितदादा तोडगा काढू शकतात. त्याबाबत अजित पवार यांच्याकडे तशी विनंती केली आहे. याचबरोबर पुण्यातील ट्राफिकचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार नसतानाही तीनवेळी गडकरी यांची भेट घेतली आहे. असं म्हणत वाघोलीतील समस्या त्याचवेळी सुटतील जेव्हा लोकांनी लोकांत मिसळणारा उमेदवार निवडून दिला पाहिजे. असेही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, वाघोलीतील सवाना सोसायटीला आढळरावांनी भेट दिला. यावेळी राजकीय मतभेद विसरून तुमच्यासारखा सामाजिक जाण असणारा नेता ही निवडणुक लढतोय अशी भावना तेथील लोकांनी व्यक्त केली. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना कोरोना पुर्वी रेल्वे सुट मिळत होती. ते सुरू करण्याची विनंती इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी आढळरावांकडे करण्यात आली.