Sunita Gaikwad - News Express Marathi

उद्योग-व्यवसायांत महिलांचे प्रमाण वाढण्यासाठी संघटनेकडून प्रोत्साहन
उद्योजिका सुनीता गायकवाड व दिपाली भांदुर्गा ‘उत्कृष्ट उद्योजिका’ पुरस्काराने सन्मानित

मोशी : मागील तीन वर्षापासून चाकण-भोसरी एमआयडीसी उद्योजक संघटनेतर्फे वार्षिक कुटूंब संमेलन आयोजित केले जाते. यंदाच्या संमेलनामध्ये उद्योजक संघटनेने महिला उद्योजकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. उद्योग व्यवसायात महिलांचा टक्का वाढावा हा त्यामागचा उद्देश ठेवून मार्गदर्शन करण्यात आले.

चाकणमधील ’23 Eleven’ या हॉटेलमध्ये संमेलन उत्साहात पार पडले. या कुटूंब संमेलनामध्ये  मध्ये शेकडो उद्योजक आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत उपस्थित होते. यावेळी उद्योजकांच्या पत्नी, मुलांची ओळख करण्यात आली. चाकण भोसरी एमआयडीसी उद्योजिका संघटना प्रमुख पौर्णिमा प्रवीण शिंदे यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये उद्योजिका ग्रुपने कोणकोणते सामाजिक व मनोरंजनात्मक उपक्रम घेतले याचा ‘पीपीटी’द्वारे आढावा दिला. सर्व उद्योजिका महिलांना असे आवाहन केले की जास्तीत जास्त संख्येने उद्योजिका संघटनेमध्ये सहभागी व्हावे.

भोसरी आणि चाकण एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्यांचे मालक पुरुषच आहेत. त्यामध्ये महिलांचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न करावे यासाठी चर्चा करून महिला उद्योजिकांना पुरस्कार देण्यात आला. अमेया इंडस्ट्रीजच्या संचालिका सुनिता किसन गायकवाड व सिद्धकला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या संचालिका दिपाली सुधीर भांदुर्गा यांना देऊन सन्मानित केले.

शुन्यातून अस्तित्व निर्माण करताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मात्र महिलांमध्ये संकटांचा सामना करण्याची क्षमता मोठी असते. आर्थिक नियोजन महिलांकडून उत्कृष्टरित्या केले जाते. त्यामुळे महिलांनी आपली क्षमता ओळखून छोट्या-छोट्या उद्योग व्यवसायाला सुरुवात करावी, असे आवाहन उद्योजिक सुनीता गायकवाड यांनी केले.

चूल आणि मुल ऐवढेच न करता चार भिंतीच्या बाहेर यावे. महिलांमध्ये तेवढी क्षमता आहे. घरामध्ये आपली क्षमता ओळखता येत नाही. त्यामुळे उद्योग व्यवसायात महिलांनी पुढे यावे असे मत उद्योजिका दीपा भांदुर्गा यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे सचिव निवास माने, खजिनदार किसन गायकवाड, संचालक दत्तात्रय दगडे व संचालक प्रवीण शिंदे यांनी मोलाचा वाटा उचलला.चाकण भोसरी एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी आभार मानले.