Mahavikas Aghadi - News Express Marathi

'अमोल कोल्हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलत सुटले'; आढळराव पाटील
पुणे : गेल्या काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच  मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक ऐवजी शिरूरमधून उमेदवारी देण्याबाबत डोक्यात होतं. मात्र भुजबळांनी नकार दिल्याने त्याठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असा दावा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यावर आता आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर पलटवार केलाय.

महायुतीचे उमेदवार जरी चार पक्षांमध्ये बेडूक उड्या मारून गेले असले तरीसुद्धा पहिल्या पंसतीचे उमेदवार छगन भुजबळ होते. भुजबळांना शिरूरमधून उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात होतं. परंतु भुजबळांनी नकार दिल्याने आढळरावांनी उमेदवारी मिळाली आहे. ज्यांना 2019 मध्ये हिम्मत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभे राहून देत होते.  त्यांच्याच वळचळनीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली. असा टोला अमोल कोल्हे यांनी आढळरावांना लगावला.

अमोल कोल्हे यांनी केलेल्या टिकेला आता आढळरावांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अमोल कोल्हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलत सुटले आहेत. कोल्हे आणि संजय राऊत हे काही विधान करतात. त्याला काहीही अर्थ नसतो. मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत आहेत तर त्यांची उमेदवारी मुख्यमंत्री कसे जाहीर करणार असा सवाल करत कोल्हे हे आता आपला अज्ञाणपणा बालिशपणा दाखवत आहेत. संजय राऊत यांच्यासोबत राहून त्यांची त्यांना शिकवण मिळाली आहे. राऊतांसारखी त्यांनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये. असा सल्ला देखील आढळरावांनी कोल्हेंना दिला.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील मला शिरूरमधून निवडणुक लढविण्यासाठी विचारणा केली होती. आता सगळीकडे भाषण करत असतो. त्यामुळे माझा संबंध सगळीकडे येतो. परंतु नाशिकमध्ये मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक जण मला नाशिकमधून उभं राहण्यासाठी विनंती करीत आहेत. कदाचित नाशिकमधून उभा राहिलो तर निवडून पण येईन असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय.

आढळराव पाटील यांना निवडून आणण्याची 'या' कार्यकर्त्यांनी घेतली शपथ
पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी जोरदार तयारी केलेली आहे. शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील अशी या मतदारसंघात लढत होत आहे.  जुन्नर तालुक्यात प्रचार करत आसतान शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून आणण्याची शपथ घेण्यात आली आहे.

जुन्नर तालुक्यातील प्रचारा दरम्यान भाजप नेत्या आशा बुचके यांच्या घरी शिवाजीराव आढळराव पाटील गेले  होते, यावेळी बेणके, सोनवणे, काळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी चहापानानंतर  आढळराव पाटील घरातून बाहेर पडण्यापूर्वी या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेत  ''हम सब साथ है अशा घोषणा दिल्या आढळराव पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला असून त्यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठवायचं आणि 400 पार मध्ये  मोदींसाठी एक आपला खासदार द्यायचा अशी शपथ घेण्यात आली.

"अमोल कोल्हे राजकारणातील दुसरे संजय राऊत", आढळरावांनी कोल्हेंना डिवचलं
पुणे : संपुर्ण देशात एव्हाना राज्यात लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारा शिगेला पोहचला आहे. अशातच विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होतांना दिसत आहे. अशातच एका पत्रकार परिषदेत संजय राऊतांचा उल्लेख करत  अमोल कोल्हे यांच्यावर आढळरावांनी चांगलीच फिरकी घेतली आहे.

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे.  ते राजकारणातील दुसरे संजय राऊत आहेत. अशी टिका आढळरावांनी कोल्हेंवर केलीय. यातच मागील पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघात काय कामं केलीत ते त्यांनी दाखवावे ? असं म्हणत आढळरावांनी थेट अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिलंय.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, शिरूरच्या विद्यमान खासदारांनी पाच वर्षात काहीच काम केले नाही. मात्र, त्यानंतरही त्यांची बडबड आणि पोपटपंची सुरू आहे. अजित पवार काही बोलले, की त्यांची वचवच सुरू होते. कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांना पाच वर्षात काय काम केले. हे दाखविता येत नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.

तर मी खासदार असताना केलेल्या कामांची उद्घाटने कोल्हे करीत आहेत. पाच वर्षात ते मतदारसंघात फिरकले नाहीत. मात्र त्यानंतरही निवडणुक लढविताना त्यांना लाज वाटत नाही. अशी टिका देखील त्यांनी केली.