Mahayuti - News Express Marathi

`महायुती’च्या उमेदवारांच्या पथ्यावर शरद पवारांचा सेल्फ गोल!
`पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एका गटाचे नेते शरद पवार  यांनी वादग्रस्त विधान करून सेल्फ गोल मारून घेतला आहे. या निवडणुकीनंतर छोटे-छोटे पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील, या त्यांच्या निवेदनानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा मानला जात आहे की शरद पवार यांचा गट हा तर कॉंग्रेसमध्ये जाईलच पण जाताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटालाही घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीचे उमेदवार मात्र खुश झाले आहेत.

शिरुर मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाचे डॉ. अमोल कोल्हे  यांच्या विरोधात लढत असलेले शिवाजीराव आढळराव तसेच मावळमध्ये उबाठा गटाच्या विरोधात लढत असलेले श्रीरंग बारणे यांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातील महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांनाही अर्थातच शरद पवार यांच्या या उद्‌गाराचे होकारात्मक पडसात जाणवतील.

गेल्या आठवड्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले होते की दि. ४ जूनच्या निकालानंतर महाराष्ट्रातील दोन राजकीय पक्ष पूर्णपणे संपतील. या त्यांच्या भाकितानंतर लगेचच शरद पवार यांनी जे उद्‌गार काढले ते देखील धक्कादायक मानले जातात. ते दोन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील शरद पवार यांचा गट  आणि शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांचा गट हे स्पष्ट झाले आहे.

शरद पवार यांनी हा खुलासा करताना आपल्याबरोबर उद्धव ठाकरे यांचा गटही  येईल, असेही सांगून टाकले असल्याने शिवसेनेच्या उबाठा गटात एकच खळबळ उडाली आहे.

एकीकडे महायुतीचा झंझावाती प्रचार आणि दुसरीकडे विरोधकांची उडणारी धूळधाण पाहता आणि पुणे जिल्ह्यापुरता विचार करता शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे आणि मुरलीधर मोहोळ या उमेदवारांना अनुकूल असेच
शरद पवार यांचे वक्तव्य मानले जाते.

दि.४ जूनच्या निकालानंतर देशातील छोटे प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील. असे झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचाही त्याला फारसा विरोध नसेल. आमची आणि कॉंग्रेसची विचारसरणी साधारण एकच असल्यामुळे हे सहज शक्य आहे. असे झाल्यास कॉंग्रेसचे नेते सुद्धा या भूमिकेचे स्वागतच करतील.
-  शरद पवार, ज्येष्ठ नेते

“भविष्यात निवडणूक लढेल की नाही, पण यावेळेला एक संधी द्या”, आढळराव पाटलांकडून मतदारांना भावनिक साद
पुणे : महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा उद्या थंडवणार आहेत. अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. भविष्यात निवडणूक लढेल की नाही, सांगता येत नाही. परंतु यावेळी मला काम करण्याची संधी द्या. जी कामे अपुर्ण राहिली आहे. ती पुर्ण करण्यासाठी तुमचे आशीर्वाद द्या. असे आढळरावांनी एका सभेत म्हटलंय.

मागील काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील जोरदार प्रचार करतांना दिसत आहे. यातच आता अजित पवारांच्या सभा देखील शिरूरमध्ये होत आहेत. तर महायुतीचे सर्वच नेते, स्थानिक पदाधिकारी, आढळरावांसाठी झपाटून काम करतांना दिसत आहेत. यातच शेवटच्या टप्प्यात आढळराव पाटलांकडून मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एका सभेत आढळराव पाटील म्हणाले की, खेड तालुक्यातील जनतेने मला पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून दिलं. याचं सगळं श्रेय खेड तालुक्याला जातं. खेड तालुक्यातील जनतेमुळे मी तिनदा खासदार झालो. ३० वर्षे मला या मतदारसंघात काम करताना तुम्ही पाहिले आहे. खेड तालुक्यासह शिरूर मतदारसंघातील कामे करण्यासाठी मला ताकद द्या. ही माझी शेवटची निवडणूक आहे”, असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटलांनी जनतेला भावनिक साद घातली आहे.

पुढे बोलतांना ते असेही म्हटले की, भविष्यात निवडणूक लढेल की नाही लढेल काही सांगता येत नाही. पण यावेळेला संधी द्या. आपल्या भागात जी कामं अपुर्ण राहिली ती पुर्ण करण्यासाठी सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. ही शिवरायांची भूमी आहे. क्रांतीकारांची भूमी आहे. ही शूरवीरांची भूमी आहे.  या भूमीतल्या वीराने एकदा निर्णय घेतला तर कोणाचे काय ऐकत नाही. त्यामुळे येणाऱ्या 13 तारखेला माझं चिन्ह घड्याळ आहे.  घड्याळ घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचा बटन दाबून मला विजयी करा. असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ संघटनेकडून आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र
मंचर :  महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विविध संघटनांचा पाठिंबा वाढू लागला आहे. अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. महासंघाचे संस्थापक प्रल्हाद गुळाभिले यांच्या सूचनेवरून हा पाठिंबा देण्यात आल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश लोकसभा प्रभारी अनिल ताके पाटील यांनी नमूद केले.

जयमल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने यापूर्वीच आढळरावांना पाठिंबा दिला असून संघटना आढळराव यांच्या प्रचारकार्यात सक्रिय आहे. तर नुकताच कष्टकरी जनता आघाडीनेही आढळराव यांना पाठिंबा दिला आहे.

कुणबी मराठा महासंघाने महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या पाठिंबा पत्रात म्हटले आहे की, विकासाचे व्हीजन घेऊन २०१४ पासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात सरकार काम करत आहे. आमच्या संघटनेच्या समन्वयक व अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षा संगीता गुंजाळ यांनी या भागातील सर्व महायुतीच्या उमेदवारांशी मराठा आरक्षण व सगेसोयरे अंमलबजावणीबाबत चर्चा केली आहे. सकल मराठा समाजाच्या प्रश्नावर संसदेत आवाज आपण आवाज उठवाल, ही खात्री झाली आहे. तसेच आपले सरकारच आम्हाला योग्य न्याय देईल, अशा विश्वास आम्हाला आहे.

दरम्यान, रिक्षा चालक, फेरीवाले, धुणेभांडी करणार्या महिला, बांधकाम मजूर यांचे संघटन असलेल्या कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे उर्फ माऊली यांनी देखील आढळराव यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात रिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ केले. त्यामुळे आमचा २५ वर्षांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

तसेच, जयमल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आढळरावांच्या प्रचारात सक्रीय असून यापूर्वी शिरुर, न्हावरा येथे मोठ्या सभांतून त्यांनी आढळरावांना संघटनेच्या एकजूटीचे बळ दाखवून दिले आहे. संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आढळरावांच्या महाविजयासाठी कष्ट घेत असल्याचे ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.

“तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर..,’आढळरावांचं मतदारांना आवाहन
शिरूर : शिरूर मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न तसेच वाहतुकीचा आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हजारो कोटींचा निधी लागणार आहे यासाठी केंद्रातल्या सत्तेत बसणारा खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले तर हे प्रश्न सुटतील, विकासकामे मार्गी लागतील, समोरच्या उमेदवाराचा पराभव दिसू लागल्याने माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जात आहे. मात्र याला जनता मतदानाच्या माध्यमातून उत्तर देईल असा पलटवार महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी केला.

पाच कंदील चौक येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विराट सभा झाली यावेळी आढळराव पाटील बोलत होते. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले,”ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची आहे. या निवडणूकीत आपण आपल्या देशाचे पंतप्रधान ठरवणार आहोत. येथे खरी लढत   विकासपुरुष नरेंद्र मोदी  आणि राहुल गांधी यांच्यात आहेत.परंतू कुठल्याही व्यक्तीला विचारले तर पंतप्रधान पदासाठी मोदीजीच हवेत असे नागरिक सांगतात. राम मंदिरासारखा आपल्या अस्मितेचा प्रश्न फक्त मोदीजीच सोडवू शकले. 370 सारखे कलम फक्त मोदीजी यांनीच काश्मीरमधून हटविले. मागील 10 वर्षांत अनेक विकासकामे देशात झाली आहेत.

गेल्या निवडणूकीत मी पराभूत होऊनही मी पायाला भिंगरी लावून फिरलो, मोठा निधी मतदार संघात आणला आहे. मी 20 वर्षांत अनेक प्रकल्प मतदार संघात आणून मतदारसंघाचा कायापालट केला आहे.   2014-15 च्या दरम्यान आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू आणि तुळापूर येथे करण्याचा 140 कोटींचा विकास आराखडा सादर केला. 400 कोटींचा विकास आराखडा मंजूर करुन घेतला. आता त्याचे कामही सुरु झाले आहे. माझे व तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर आपल्याला सत्तेमधील खासदार निवडून द्यावा लागेल. समोरचा विद्यमान खासदार याने पाच वर्षांत कुठलेही काम केले नाही. हक्काचा निधी या निष्क्रिय खासदारामुळे परत गेला आहे. सध्या माझ्यावर खोटारडे आरोप केले जात आहेत. हे षडयंत्र एखादा बहुरुपीच करु शकतो. पण यावेळी जनता यांना भुलणार नाही. लोकं मला आत्मियतेने सांगतात गेल्या वेळी आमची चूक झाली आता ती आम्ही दुरुस्त करु. असेही आढळराव पाटील यांनी सांगितले

या निवडणुकीनंतर शिरूरच्या चार गावांचा पाणीप्रश्न, जुन्नरच्या आणे पठाराचा पाणीप्रश्न आणि आंबेगावच्या सातगाव पठारचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्यक्रम  असल्याचेही आढळराव पाटील यांनी सांगितले. येणाऱ्या 13 तारखेला आपण जागृत राहून मला घड्याळाला जास्तीत-जास्त मतदान करावे अशी विनंती पाटील यांनी केली.

रुग्णालयातील दिलीप वळसे-पाटील यांची शिवाजीराव आढळराव पाटलांकडून विचारपूस!
पुणे : शिरूरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात लोकसभेची निवडणुक होत आहे. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपला प्रचार धडक्यात सुरू केला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे देखील चांगलचे सक्रीय झाले आहेत. अशातच आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आढळराव पाटलांनी भेट घेऊन तब्येची विचारपुर केली आहे. काही दिवसांपुर्वी वळसे पाटलांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांची आढळराव पाटलांनी भेट घेतली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी गटातील आमदारांनी आढळरावांच्या प्रचारासाठी चांगल्याच बैठका सुरू केल्या आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून डाव्या मांडीचे हाड व डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे मंत्री दिलीप वळसे पाटील दवाखान्यात उपचार घेत होते. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. अशातच आता शिवाजीराव आढळराव पाटलांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची विचारपूस करण्यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपणा सर्वांना हे सांगताना अत्यंत समाधान वाटत आहे की, नामदार साहेबांची प्रकृती हळू हळू सुधारत आहे आणि लवकरच सक्रिय होऊन ते पुनः सगळा कार्यभार आपल्या हाती घेणार आहेत. जनतेच्या आशिर्वादाने हे सगळं लवकरच शक्य होईल असा विश्वास साहेबांनी व्यक्त केल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी शिवाजीराव आढळराव पाटलांच्यासोत माजी जिल्हापरिषद सदस्य अरूण गिरे, शिवाजी राजगुरू आदी उपस्थित होते.

विद्यमान खासदारांविरुद्ध जनतेच्या मनात आक्रोश : हडपसरमध्ये आढळरावांचा हल्लाबोल
पुणे : मागील पाच वर्षात शिरूर मतदारसंघात एक रुपयाचा देखील निधी आणला नाही. 80 टक्के खासदार निधी वाया गेला.  विद्यमान खासदार  मतदार संघात फिरकलेच नाहीत. अनेक गावात त्यांच्या विरोधात बॅनर लागले आहेत. असा निष्क्रिय खासदार पराभूतच होणार आहे. दुसऱ्यांवर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, अशी टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यामान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची आज मांजरी परिसरात प्रचार रॅली आयोजित करण्यात आली. मांजरी बुद्रुक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. वाजत गाजत काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी यामध्ये आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, विद्यमान खासदार पाच वर्षात एकदाही मतदार संघात उपस्थित राहिले नाही. त्यांचा 80 टक्के निधी परत गेला आहे. शिवाय केंद्रातून एकही रुपयाचा निधी त्यांना आणता आला नाही. गावोगावी त्यांच्या विरोधातील फलक लावले आहे. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये त्यांच्या विषयी आक्रोश आहे. आज पर्यंत मी केलेल्या प्रचाराला उस्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माझ्या प्रचाराला मिळत असलेल्या प्रतिसाद पाहता हडपसर मतदार संघातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

“कोरोना संकटातच कोल्हेंची राजीनाम्याची तयारी !”अजित पवारांचा गौप्यस्फोट
पुणे : पाच वर्षांपूर्वी आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी आपण झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोनाचे संकट आले आणि अशा संकटातच “ते” राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते. असा गौप्यस्फोट शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाबत मोशी येथे केला. महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मोशी येथील गणेश बैंक्वेट हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भोसरी विधानसभेतील केंद्रप्रमुख व बूथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीत अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.

मेळाव्याला शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट,  राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुक ही देशाची निवडणूक आहे. ती गावकी भावकीची निवडणूक नाही. मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवारांसाठी आपण अशाच प्रकारचे मेळावे घेतले होते. सभा घेतल्या. त्यांना निवडून आणण्यासाठी आपण झटलो. त्यांना निवडून देखील आणले. मात्र निवडून आल्यानंतर दीड दोन वर्षातच कोरोनाचे संकट आले. ज्यांना आपण निवडून आणले ते माझ्याकडे राजीनामा घेऊन आले होते. त्यांना मी विचारले की तुम्हाला कशासाठी राजीनामा द्यायचा आहे. असे करू नका.

आढळरावांकडे विकासाची दृष्टी

लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. या निवडणुकीतून येणारा निकाल आपले भविष्य ठरवत असतो. विकासात्मक पातळीवर देशाला पुढे नेण्याचे काम लोकसभेच्या निवडणुकीतून आपल्याला करायचे आहे. त्यासाठी विकासाची दृष्टी असणारा ताकतीचा नेता आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून आपल्याला संसदेत पाठवायचा आहे. शिरूर मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील हे विकासाचे व्हिजन ठेवणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याचे काम आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करायचे आहे असे आवाहन अजित पवार यांनी केले.

नरेंद्र मोदींच्या सर्व योजना कौतुकास्पद व जनसामान्यांना दिलासा देणाऱ्या : शिवाजीराव आढळराव पाटील
भोसरी : महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील भोसरी दौरा दरम्यान चिखली येथे आयोजित नमो संवाद सभेला उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी गाथा काँलनी, अभंग विश्व फेज सोसायटी, मिरर आरकेड, गव्हाणे आंगण, ग्लोरिया, साई मांगल्य, हरि प्रिया हाईट्स येथिल सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, नमो संवाद संकल्पना ही गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या महत्त्वपूर्ण योजना राबवली गेल्या याचा ऊहापोह मांडण्यासाठी सुरू केला आहे. आणि या उपक्रमाला जनतेकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. आमदार महेश लांडगे यांनी दहा वर्षात केलेली कामे दमदार ठरली. नरेंद्र मोदी यांच्याशी फार जवळून काम करण्याची मला संधी मिळाली. दरम्यान मी अनुभवलं २०१४ अगोदरचा आपला देश आणि त्यानंतरचा आपला देश यात फार फरक आता आपल्याला दिसत आहे.

३७० कलम हटविण्याचा निर्णय असेल, तितका धाडसी निर्णय घेण्याची क्षमता कुठल्याच नेत्यांमध्ये नसेल. आत्ताच्या योजना हे जनतेमधील सर्वसामान्य पर्यंत पोहोचणारे आहेत. थेट नळाच्या माध्यमातून १३ लाख ३८ हजार घरांमध्ये पाणी पोहोचवलं आहे. मोदीजींना अमलात आणलेल्या पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या थेट खात्यांमध्ये पैसे जातात, पुढील पाच वर्षातही या योजना लागू राहणार आहे. अशा योजना लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.

प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य विजू फुगे, शिवसेना उपनेतेे इरफान सय्यद, समन्वयक महायुती भोसरी दत्तात्रय भालेराव, नगरसेवक अंकुश मळेकर, नगरसेवक संतोष मोरे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, भाजप उपाध्यक्ष किसन बावकर, भाजप महिला पिंपरी चिंचवड सरचिटणीस सोनम मोरे, समाजसेवक अंकुश मळेकर, युवा नेते विनायक मोरे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

'अमोल कोल्हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलत सुटले'; आढळराव पाटील
पुणे : गेल्या काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच  मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक ऐवजी शिरूरमधून उमेदवारी देण्याबाबत डोक्यात होतं. मात्र भुजबळांनी नकार दिल्याने त्याठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असा दावा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यावर आता आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर पलटवार केलाय.

महायुतीचे उमेदवार जरी चार पक्षांमध्ये बेडूक उड्या मारून गेले असले तरीसुद्धा पहिल्या पंसतीचे उमेदवार छगन भुजबळ होते. भुजबळांना शिरूरमधून उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात होतं. परंतु भुजबळांनी नकार दिल्याने आढळरावांनी उमेदवारी मिळाली आहे. ज्यांना 2019 मध्ये हिम्मत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभे राहून देत होते.  त्यांच्याच वळचळनीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली. असा टोला अमोल कोल्हे यांनी आढळरावांना लगावला.

अमोल कोल्हे यांनी केलेल्या टिकेला आता आढळरावांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अमोल कोल्हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलत सुटले आहेत. कोल्हे आणि संजय राऊत हे काही विधान करतात. त्याला काहीही अर्थ नसतो. मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत आहेत तर त्यांची उमेदवारी मुख्यमंत्री कसे जाहीर करणार असा सवाल करत कोल्हे हे आता आपला अज्ञाणपणा बालिशपणा दाखवत आहेत. संजय राऊत यांच्यासोबत राहून त्यांची त्यांना शिकवण मिळाली आहे. राऊतांसारखी त्यांनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये. असा सल्ला देखील आढळरावांनी कोल्हेंना दिला.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील मला शिरूरमधून निवडणुक लढविण्यासाठी विचारणा केली होती. आता सगळीकडे भाषण करत असतो. त्यामुळे माझा संबंध सगळीकडे येतो. परंतु नाशिकमध्ये मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक जण मला नाशिकमधून उभं राहण्यासाठी विनंती करीत आहेत. कदाचित नाशिकमधून उभा राहिलो तर निवडून पण येईन असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय.

'तुम्ही लोकांशी गद्दारी केली, त्यामुळें तुम्ही निष्ठेच्या गोष्टी सांगूच नका'; आढळराव पाटील यांच्या अमोल कोल्हे यांना टोला
पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्यात आरोप प्रयत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झडत असल्याचे दिसते.  निष्ठेच्या व विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना पाच वर्षात स्वतःच्या कोल्हेमळा रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडवता आला नाही, त्यासाठी मी २५ कोटी रूपये मिळवून दिले. अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉ. कोल्हे यांना चांगलेच सुनावले.

शिवाजी आढळराव पाटील आंबेगाब तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना कळंब येथे जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आढळराव पाटील यांनी स्वतः केलेल्या कामांची यादी वाचून दाखवत  डॉ. कोल्हे यांच्या निष्क्रिय कारकिर्दीवर जोरदार टीका केली.

पुढे बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले मी पंधरा वर्षात काय केलं असं विरोधक विचारत आहेत. मी कमलजा देवीची शपथ घेऊन सांगतो की पुणे – नाशिक महामार्गावरील खेड ते सिन्नर हा रस्त्याची मी मागणी केली, मी त्याचा पाठपुरावा केला, त्यासाठी मी भांडलो आणि  हा रस्ता व या रस्त्यावरील सर्व बायपास मी मंजूर करून आणले.  भोसरी पासून आळेफाट्या पर्यंत व भीमाशंकर पासून इनामगाव पर्यन्त प्रत्येक गावात माझी कामे आहेत. मी पंधरा वर्षांत काय केलं हे सर्व जनतेला महिती आहे. तुम्ही कुठली कामे केली हे स्पष्टपने सांगा. साडेचार वर्षांनंतर निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आठवण झाली, त्यापूर्वी शेतकऱ्यांचे प्रश्न नव्हते का, शेतकऱ्यांना अडचणी नव्हत्या का? तेंव्हा तुम्ही कुठे होता? असा प्रश्न आढळराव यांनी उपस्थित केला.

लोकसभेत भाषणे केली म्हणजे सर्व समस्या सुटतात असे नाही. मतदार संघातील उपस्थिती कमी व लोकसभेतही उपस्थिती कमी, यावर प्रश्न विचारला तर म्हणायचं मी शेतकऱ्याचा पोरगा, मी शेतकऱ्याचा पोरगा. तुम्ही संसदेत पाच वर्षांत २६ भाषणे केली तर मी शेवटच्या पाच वर्षांत ५३ भाषणे केली. तुमच्या निष्क्रियता बाबत प्रश्न विचारला तर तुम्ही कांदा, कांदा म्हणता. खेड सिन्नर रस्ता मी मंजूर केला व तो माझ्यामुळेच झाला. पुणे-नाशिक रेल्वेसाठी मी प्रयत्न केले मी मंजुरी मिळवली, रेल्वे बाबत मी जेवढे काम केले आजही तो प्रकल्प त्याच स्थितीत आहे, पाच वर्षांत त्याला काहीच गती मिळाली नाही. चाकणच्या ट्रॅफिक वरुन माझ्यावर टीका केल्या, तुम्हाला त्यात काही करता आले नाही, चाकणची ट्रॅफिक आता डबल वाढली आहे.

मी एकनिष्ठ, आरे हो बाबा तू एकनिष्ठ, त्यासाठी तुला अजुन एखादा अवॉर्ड देऊ, पण लोकांच्या प्रश्नांचे व समस्यांचे काय, तुम्हाला तुमच्या राहत्या कोल्हे मळ्याच्या रस्त्याचा प्रश्न सोडवता आला नाही, त्या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मी २५ कोटी रुपयांचा निधी दिलाय. तुम्ही फक्त लोकांशी गद्दारी केली, त्यामुळें तुम्ही निष्ठेच्या गोष्टी सांगूच नका असा टोला  आढळराव पाटील यांनी लगावला.

मंचरच्या ग्रामस्थांचा आढळरावांना पाठिंबा, मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार
पुणे :  शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रत्येक ग्रामस्थाचं मत म्हणजे मंचरच्या विकासाला मत असल्याचा सुर मंचरच्या गावबैठकीत व्यक्त करण्यात आला. आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र असलेल्या आढळराव यांना संपुर्ण पाठिंबा देण्यासाठी मंचर येथील भैरवनाथ गल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत मंचर शहरातील विविध राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी बांधव, शेतकरी इत्यादींनी आढळराव पाटील यांना पाठिंबा देऊन मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला सर्वच जातीधर्माच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली. तर उद्योजक आणि शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब बेंडे म्हणाले की, जो विकास करतो, त्याच्यामागे पाठीमागे ठामपणे उभे राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी आंबेगावचे सुपुत्र आढळराव पाटील यांच्यासारख्या सक्षम नेत्याला निवडून देण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे.

तर अरूण लोंढे म्हणाले की, स्वकर्तृत्वान असलेले आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्याच्या विकासाचा चेहरामोहरा बदलला आहे. रामदास बाणखेले म्हणाले की, आढळराव पाटील यांनी स्वत: खासदार नसतानाही मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून विकास निधी आणल्यामुळे मंचरकर खूश राहणार असल्याचे व्ही. एस. महामुनी, सीताराम लोंडे यांनी सांगितले.

महायुतीच्या आढळराव पाटलांचे वाघोलीकरांकडून जोरदार जंगी स्वागत..नागरिकांकडून मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद!
वाघोली : लोकसभा निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसा प्रचाराला देखील वेग लागला आहे. उमेदवारांकडून प्रत्यक्ष गाठीभेठी आणि पदयात्रेवर भर दिला जात आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी शुक्रवारी हडपसर विधानसभा मतदार संघाचा दौरा केल्यानंतर आज वाघोली – शिरूर  विधानसभा मतदार संघातील वाघोली परिसरात दौरा केला.

वाघोलीतील वाघेश्वर स्पोर्ट्स क्लब येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी आजच्या दौऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर ड्रीम संकल्प सोसायटी येथे जावून स्थानिकांशी संवाद साधत, समस्त माता-भगिनींकडून व ज्येष्ठांकडून महायुतीच्या विजयासाठी आशिर्वाद घेतले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त केसनंद फाटा येथे जावून वाघोलीचे उपसरपंच मारुती भगवंत गाडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी बीजेएस महाविद्यालयासमोर राष्ट्रवादी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत शिवाजीराव अढळराव पाटील यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी कार्यअहवाल वाटपादरम्यान, ”घड्याळ तेच, वेळ नवी” अशी घोषणा करत उपस्थित समस्त पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांना प्रचंड बहूमातांनी, महायुतीला विजयी करण्याचा निर्धार केला.

त्यानंतर ऑक्सीव्हॅली-२, नियती वेलान सोसायटी येथील रहिवाश्यांची भेट घेतली. स्थानिकांशी संवाद साधत असता, येथील  पाण्याची समस्या, ड्रेनेजची समस्या व इतर समस्यांवर चर्चा करत, त्यांचे निवारण करण्याचे आश्वासन देखील अढळराव पाटलांनी त्यांना दिले.

यावेळी पुणे जिल्हापरिषद माजी अध्यक्ष प्रदिप कंद, स्वीकृत नगरसेवक शांताराम बापू कटके, भाजपा हवेली तालुकाध्यक्ष श्याम गावडे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी उमेश उंद्रे, उपाध्यक्ष भाजपा पुणे दादासाहेब सातव, युवा जिल्हा प्रमुख पुणे गणेश सातव पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप सातव, युवा सेना शहर प्रमुख वाघोली यश सातव, युवा सेना मंगेश सातव, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब सातव, पुणे जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस योगिता सातव, सोशल मीडिया अध्यक्ष अश्विनी पांडे, जिल्हा सचिव भाजप मोहन  शिंदे, महिला मोर्चा वाघोली अध्यक्ष विद्या पाटील आदी उपस्थित होते.