शिरुर लोकसभा - News Express Marathi

"तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते", मोहिते पाटलांची पवारांवर जहरी टिका, शिरूरचं वातावरण तापलं
पुणे : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शिरूरमध्ये पहिल्यांदाच दोन्ही पवारांमध्ये हाय व्होल्टेच सामना बघायला मिळत आहे. अजित पवारांकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर शरद पवारांकडून अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता दोन्ही बाजूच्या गटाकडून एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या शिरूरमध्ये राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे.

अजितदादा गटातील आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. कांद्याचे, दुधाचे दर कोसळण्याला थेट शरद पवारांना जबाबदार धरलं आहे. शरद पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते. अशी घणाघाती टिका मोहिते पाटलांनी शरद पवारांवर केलीय.

यावेळी दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, शरद पवार कृषीमंत्री होते. तेव्हा त्यांनी एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांची ही अवस्था झाली नसती. तुम्ही कधीही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासोबत बसून चर्चा केली नाही. आज ती चर्चा केली असती तर शेतकरी चांगलाच सुखावला असता. त्यावर देशात कृषी खात्यामध्ये फार पुढे गेला आहे. देश निर्यातीपर्यंत पोहोचला आहे. कांदा निर्यात करायच्या वेळी निर्यात बंदी करण्यात आली. असं तुमचं सरकार करत असेल तर तुम्ही झोपा काढत होता का ? असा सवाल जयंत पाटलांनी मोहिते पाटलांना केलाय. तर मोहिते सत्तेत जाण्यासाठी कसे लाचार झालेत आणि ते कसे महागद्दार आहे. हे सांगताना कोल्हेंनी गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी भूमिका कशा घेतल्या. याचा पाढाच वाचला.

आढळरावांच्या कोपरासभांना शिरूरमध्ये मोठा प्रतिसाद, विकासाची जबाबदारी माझी, आढळरावांचं मतदारांना आश्वासन
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे. तसा प्रचाराला प्रंचड वेग येत आहे. अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोपरा सभा घेण्यास सुरूवात केलीय. आढळरावांच्या कोपरा सभांना आता नागरिकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळत आहेत. त्यातच अण्णापुर येथे गावकऱ्यांनी आढळरावांचं जंगी स्वागत केलं.

अण्णापुर येथे झालेल्या कोपरा सभेत आढळरावांनी लोकांना विश्वासात घेत लोकांना महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केलं.  यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, माझ्यावर तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला सार्थ करण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे. मला तुम्ही पाठिंबा  देणारच आहात. तुमच्या भागाच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर सोडून निश्चित राहा, असे आवाहन आढळरावांकडून करण्यात आले.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रामलिंग येथे भेट देऊन ग्रामदैवत रामलिंग महादेवाचे आढळराव पाटील यांनी दर्शन घेतले. शोभाताई रसिकलाल धारीवाल सभामंडपात मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना गावाचे प्रलंबित प्रश्न नक्कीच मार्गी लावणार असे आश्वासन दिले.

दरम्यान, कर्डेलवाडील येथेदेखील आढळराव यांचे उत्स्फुर्त स्वागत झाले. यावेळी प्रवीण कर्डिले म्हणाले की , सत्तेत नसतानाही आढळराव दादांनी आपल्या विकासकामांना हातभार लावला. त्यामुळे आपण त्यांच्या पाठीशी उभे राहु. या वेळी बोलतांना आढळराव यांनी पिण्याच्या पाण्याचा आणि रस्त्यांच्या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढून हा प्रश्न मिटवला जाईल असेही त्यांनी सांगितले.

शिरुर लोकसभा: मतदारांची निराशा करणाऱ्यांना निवडून देणार का ?
कवठे येमाई : "पाच वर्षे खासदार राहून त्यांनी अनेक वचने दिली; पण एकही पूर्ण केले नाही. सर्वसामान्य नागरिकांची निराशा केली. एकही रुपयाचा निधी आणला नाही. अशांना आता निवडून देणार का?" अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी समाचार घेतला. गावगप्पा मारणार्यांना घरी बसविण्याची हीच वेळ असल्याचे सांगत डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

कवठे येमाई येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पूर्वा दिलीप वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, मानसिंगराव पांबूरकर, डॉ. सुभाष पोकळे, मारुतराव शेळके, सुदाम इंचके, अनिल शिंदे, बाळासाहेब बेडे, भगवान शेळके, बापूसाहेब शिंदे, प्रकाशराव पवार, सविताताई बगाटे आदी उपस्थित होते. आढळराव पाटील म्हणाले की , आता ही देशाची निवडणूक आहे. आपल्या सर्वांचे भवितव्य ठरवणारी आहे. गेल्या वेळी केलेली चूक परत करू नका. संसदेत कोणी किती प्रश्न मांडले याचा हिशोब त्यांनी सांगितला. ते म्हणाले की विद्यमान खासदाराने संसदेत ६२९ प्रश्न मांडले, मी ११०२ प्रश्न मांडले. याचा वेध घेण्याची हीच वेळ आहे. पोपटराव गावडे म्हणाले की,

विकासकामांसाठी विकासपुरुष आढळराव पाटील यांना निवडून आणावेच लागेल. विद्यमान खासदार आले आणि गायब झाले. मात्र आढळराव पाटील यांनी जमिनीशी असणारी नाळ केव्हाच तुटु दिली नाही. जमिनीशी नातं असणारा हा नेता आहे. मतदारसंघात भरघोस निधी त्यांनी आणला आहे.

डॉ. सुभाष पोकळे म्हणाले, कवठे येमाई गाव आणि आढळराव यांचे वेगळे नाते आहे. त्यांच्यासाठी आपण ठामपणे मागे आहोत. ज्यांना नियी असूनही वापरता आला नाही, त्यांचे हे काम नव्हे, त्यासाठी आढळराव पाटील यांना पर्याय नाही.

अभिजित बोराटे म्हणाले, सेटवरचा माणूस सेटवर पाठवायची हीच वेळ आहे. त्यांनी केवळ निधी आणण्याचे नाटक केले, म्हणून तर त्यांच्या काळातला ८० टक्के निधी परत गेला; मात्र अनुभवी अशा आढळराव यांनी दीड हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे त्यांच्यासाठी आपले मत महत्वपूर्ण आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघात लांडेंच्या भेटीतून आढळरावांचे पारडे जड!
पुणे : उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. लांडे यांची नाराजी दूर करण्यात आढळरावांना यश आल्यास त्यांच्या ते पथ्यावर पडणार आहे. महायुतीचा धर्म पाळल्यास भोसरीतून आढळरावांना मोठे मताधिक्य मिळेल असे राजकीय गणित जाणकारांकडून मांडण्यात येत आहे.

महायुतीमधील अजित दादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शिरूरसाठी उमेदवारी मिळेल असा आडाखा माजी आमदार विलास लांडे यांनी बांधला होता. दरम्यानच्या काळात उमेदवारीवरून राजकीय घमासान झाले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाबत मतदारसंघ विजयी होण्यासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश घडवून आणत त्यांना उमेदवारी देखील बहाल करण्यात आली. या निर्णयामुळे भोसरीचे चाणक्य असलेले विलास लांडे नाराज झाले. उमेदवारी आढळरावांना जाहीर झाल्यापासून ते राजकीय विजनवासात गेल्याचे चित्र होते. माध्यमांना त्यांनी त्यानंतर प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तसेच राजकीय सार्वजनिक कार्यक्रमांना दांडी मारण्यास त्यांनी सुरुवात केली.

भोसरी विधानसभेत तब्बल  पाच लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. या मतदारसंघात असणारे विलास लांडे हे महत्वाचे आणि मोठे नेते आहेत. लांडे नाराज झाले तर त्याचा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो याची जाणीव आढळराव पाटील यांना आहे. त्यामुळे त्यांनी भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविलयातील कार्यालयात जाऊन लांडे यांची भेट घेतली. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विविध माध्यमांना प्रतिक्रिया देताना लांडे यांची नाराजी दूर झाल्याचे नरेटिव्ह तयार करण्याचे काम आढळराव पाटील यांनी केले. सोशल मीडियावर देखील लांडे आणि आढळराव यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. ही चर्चा आढळरावांना सकारात्मक ठरेल असे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष त्याचा निवडणुकीत किती फायदा होतो पाहणे रंगतदार ठरणार आहे.

...म्हणून लांडे सोबतीला असणे गरजेचे !

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार विलास लांडे यांना ९० हजार मते पडली आहेत. त्यांचा पराभव झाला खरा. मात्र त्यावेळी त्यांच्या राजकीय खेळ्या चांगल्याच चर्चेत राहिल्या होत्या. अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना त्यांनी अजित दादांची मनधरणी करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अर्ज भरायच्या पाच मिनिटे आधीच माघार घ्यायला लावली. थेट चिन्हावर आणि पक्षावर न लढताही त्यांनी वरिष्ठांचा आशीर्वाद आपल्या बाजूने ठेवण्याची किमया केली होती. त्यांच्या या राजकीय खेळ्या अनेकांच्या अडचणीच्या ठरू शकतात याची जाणीव आढळराव पाटील यांना होती. त्यामुळे आधीच भेट घेऊन त्यांची मनधरणी करत लांडे यांची ताकद आपल्या बाजूने ठेवण्याची गरज आढळरावांना देखील निर्माण झाल्याची चर्चा आहे.