पुणे - News Express Marathi

दापोडीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाती उर्फ माई काटे यांचा पुढाकार!
पिंपरी- : दापोडी परिसराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास व्हावा, नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे यांनी पुढाकार घेतला आहे. परिसरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांसंदर्भात संबंधित पातळीवर सकारात्मक चर्चा करून कामांच्या पुढील नियोजनावर भर देण्यात आला.
दापोडीतील महापुरुषांच्या स्मारकांचा विकास, नवीन पाण्याची टाकी, नदीपात्राच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंत, स्मशानभूमी व दफनभूमीचा विकास, हुतात्मा भगतसिंग शाळेचा विकास यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा यामध्ये समावेश आहे.

नागरिकांच्या आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने दवाखाना, जिम आणि विरंगुळा केंद्र, तर सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सांस्कृतिक भवन आणि प्रशासकीय इमारतीच्या उभारणीबाबतही चर्चा करण्यात आली. लहान मुले, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन, स्विमिंग पूल आणि प्लेग्राउंड यांसारख्या सुविधा विकसित करण्यावरही भर देण्यात आला आहे.

पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दृष्टीने ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाईनची कामे, तसेच अंतर्गत व प्रमुख रस्त्यांच्या दर्जेदार विकासासाठी काँक्रीट रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याबाबत नियोजन करण्यात आले. विशेषतः गणेश नगर ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, बोपोडी पूल, एसटी रोड ते फुगेवाडी या महत्त्वाच्या मार्गावर सिमेंट काँक्रीट रस्ता विकसित करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. हा मार्ग विकसित झाल्यास परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
सिद्धार्थ नगर, प्रभाग क्रमांक ३० येथील जुने व अर्धवट अवस्थेतील शौचालय असलेली जागा मोकळी करून त्या ठिकाणी नवीन भवन उभारण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या जागेचा नागरिकांच्या उपयोगासाठी अधिक चांगल्या पद्धतीने वापर होणार आहे. दरम्यान, दापोडी येथे तलाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध झाल्याबद्दल दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभा आमदार मा. अण्णासाहेब बनसोडे, तसेच महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकारीवर्गाबद्दल स्वाती उर्फ माई काटे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

“दापोडीचा विकास हा केवळ काही रस्ते किंवा इमारतींपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रत्येक सुविधा सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक सुविधा आणि महापुरुषांच्या स्मारकांचा विकास या सर्व कामांचा सातत्याने पाठपुरावा करून दापोडीला अधिक सुंदर, सुरक्षित आणि सुविधासंपन्न बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे यांनी सांगितले.

“दापोडीचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांपासून ते शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक सुविधा, महापुरुषांच्या स्मारकांचा विकास आणि दर्जेदार रस्त्यांपर्यंत प्रत्येक कामाला गती देण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. केवळ आश्वासने नव्हे, तर नियोजनबद्ध विकासकामांच्या माध्यमातून दापोडीचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांचा विश्वास आणि सहकार्य हीच आमच्या कामाची खरी ताकद आहे.”
— स्वाती उर्फ माई काटे
नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर नियुक्ती
पिंपरी, ५ सप्टेंबर: चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF), पुणेच्या नियामक परिषदेवर पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म शाखेने जारी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने ५ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार तसेच ११ ऑक्टोबर २०२४च्या अधिसूचनेतील तरतुदींनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेवर खाणकामामुळे बाधित भाग आणि तेथील नागरिकांच्या विकासासाठी धोरण ठरविण्याची महत्त्वाची जबाबदारी असते. प्रतिष्ठानचा वार्षिक कृती आराखडा व अर्थसंकल्प मंजूर करणे, विकासकामांना मान्यता देणे, निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होत असल्याची खात्री करणे, कामांचा वेळोवेळी आढावा घेणे तसेच वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षित खात्यांना मंजुरी देणे, ही परिषदेची प्रमुख कामे आहेत.

जिल्हा खनिज अधिकारी तथा सदस्य सचिव आनंद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने हे नियुक्तिपत्र जारी केले आहे.

“जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर पदसिद्ध सदस्य म्हणून मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. खनिजबाधित भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपलब्ध निधीचा योग्य व पारदर्शक वापर व्हावा, यासाठी प्राधान्याने प्रयत्न करेन.”

शंकर जगताप
आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ

विद्यार्थी एक दिवसाचे प्राचार्या, उपप्राचार्या आणि प्राध्यापक; शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम
चिंचवड :  शिक्षक दिनाचे औचित्य साधून चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज या महाविद्यालयात ‘एक दिवस विद्यार्थ्यांचा’ हा अनोखा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी प्राचार्या, उपप्राचार्या आणि प्राध्यापकांची भूमिका पार पाडली.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर महाविद्यालयात हा उपक्रम घेण्यात आला. सकाळी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडे पदभार सोपवण्यात आला.
यामध्ये कु. मुस्कान शेख हिने एक दिवसाची प्राचार्या, कु. जेसिका शर्मा हिने उपप्राचार्या, तर ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध विभागांचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. विद्यार्थी प्राध्यापकांनी वर्गावर जाऊन तासिका घेतल्या, प्रात्यक्षिके घेतली आणि विद्यार्थ्यांच्या शंका सोडवल्या. तर विद्यार्थी प्राचार्यांनी दिवसभर महाविद्यालयाचे प्रशासन, शिस्त आणि शैक्षणिक कामकाजाचे नियोजन पाहिले.

आपल्या मनोगतात विद्यार्थी प्राचार्या मुस्कान शेख म्हणाली, “एक दिवस जरी असले तरी प्राचार्य पदाची जबाबदारी किती मोठी आहे, हे आज समजले. प्राध्यापकांना वर्ग सांभाळताना किती मेहनत घ्यावी लागते, याची जाणीव झाली.” यावेळी विद्यार्थी प्राध्यापकांनीही आपल्या भावना व्यक्त करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, स्टाफ अकॅडमीच्या समन्वयिका डॉ. जयश्री कांबळे, प्रा. स्नेहल वऱ्हाडे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन विद्यार्थी प्राध्यापकांचा खास सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांनी शिक्षकांचे महत्त्व विषद केले, तर मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी आपल्या कारकिर्दीतील अनुभव सांगून मार्गदर्शन करताना भविष्यात आदर्श शिक्षकी पेशा स्वीकारण्याचे आवाहन शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांना केले. तुमच्यात आत्मविश्वास , प्रामाणिकपणा , विद्यार्थ्याप्रती आदर हे गुण असतील तर ते अंगीकारून शिक्षकी पेक्षा भविष्यात स्वीकारावा . कारण शिक्षक हा एक पिढी धडवत असतो . चांगल्या शिक्षकांची आजही खूप गरज आहे असे सांगुन नुकताच आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आलेले महाराष्ट्रातील डॉ . कविता गित्ते , सीमा शिंदे , कुंदा बच्छाव याची सखोल माहीती उपस्थितांना दिली .

समारोप प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य व गणेश वंदना सादर केली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रियंका गंगावणे यांनी केले, सूत्रसंचालन विद्यार्थिनी सरस्वती जोशी हिने केले, तर आभार विद्यार्थी उपप्राचार्या जेसिका शर्मा हिने मानले. यावेळी सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोरवाडी ITIच्या असिफची सौदीत निवड!
पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रशिक्षणार्थी असिफ अल्लाउद्दीन मुलानी याने आपल्या कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन 2021-23 सत्रातील ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेडचा प्रशिक्षणार्थी असिफ याची सौदी अरेबियातील दमाम येथे ज्युनियर डिझायनर म्हणून निवड झाली आहे.

असिफने ITIच्या प्रथम व द्वितीय अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता. या गुणवत्तेच्या आधारावर त्याला इनप्रो कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारीची संधी मिळाली. त्यानंतर त्याची याच कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून निवड झाली.

दरम्यान, उत्कृष्ट कामकाज, तांत्रिक कौशल्य आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर असिफने कंपनीचा विश्वास संपादन केला. त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केल्यानंतर इनप्रो कंपनीने सौदी अरेबियातील आपल्या मुख्य कंपनीमध्ये असिफची ज्युनियर डिझायनर म्हणून निवड केली आहे. विशेष म्हणजे, या नियुक्तीसाठी आवश्यक असलेला सर्व खर्च कंपनीकडून करण्यात येणार आहे.

हलाखीच्या परिस्थितीतून यशाची भरारी

असिफच्या यशाला आणखी विशेष महत्त्व आहे. आई-वडिलांचे छत्र नसतानाही आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्याने संघर्ष करत हे उत्तुंग यश संपादन केले आहे. त्याचा संघर्ष आणि यशाचा प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

असिफच्या यशाने प्रेरित होऊन त्याच्या बहिणीनेही मोरवाडी ITIमध्ये चालू शैक्षणिक वर्षात ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेडला प्रवेश घेतला आहे. त्यामुळे एका विद्यार्थ्याच्या यशातून कुटुंबातील इतर सदस्यांनाही करिअरची नवी दिशा मिळत असल्याचे दिसून येते.

परदेशी शिक्षण व रोजगाराचा उपक्रम

मोरवाडी ITIकडून अशा विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देण्यात येते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे उज्ज्वल करिअर घडविण्याच्या दृष्टीने संस्थेकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली विभागांतर्गत ‘परदेशी शिक्षण व रोजगार’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

असिफने मिळवलेल्या यशाबद्दल तसेच त्याच्या पुढील वाटचालीसाठी प्राचार्य शशिकांत पाटील, गटनिदेशक ओव्हाळ आर. एस., निदेशक काळोखे व्ही. व्ही. तसेच सर्व गटनिदेशक व निदेशकांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कृष्णानगर स्पाईन रस्त्याच्या सेवा रस्त्यावरील बेकायदेशीर अवजड
मोशी : कृष्णानगर येथील स्पाईन रस्तालगत असलेल्या सेवा रस्त्यावर दिवसेंदिवस अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनचालक  त्रस्त झाले आहेत. मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या या सर्विस रस्त्यावर ट्रक, कंटेनर, ट्रॅव्हल्स यांसारखी अवजड वाहने दोन्ही बाजूंना तासनतास नव्हे तर कित्येक दिवस बेकायदेशीरपणे उभी करून ठेवली जातात. त्यामुळे या रस्त्यावरून चालणे आणि वाहने चालवणे अत्यंत कठीण झाले असून परिसरात अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

​या रस्त्यावर सतत उभ्या असणाऱ्या अवजड वाहनांमुळे संपूर्ण रस्ता अडवला जातो, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी कामानिमित्त बाहेरून घरी परतणाऱ्या महिला, तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवजड वाहनांच्या आडोशाने रात्रीच्या अंधारात मद्यपी व समाजकंटकांचा वावर वाढण्याची भीती व्यक्त होत असून महिलांना सुरक्षितपणे ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही समस्येवर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

​"कृष्णा नगर स्पाईन रोड सर्विस रस्त्यावरील अवजड वाहनांची बेकायदेशीर पार्किंग ही गंभीर समस्या बनली आहे. स्थानिक रहिवाशांना आणि विशेषतः महिलांना रात्रीच्या वेळी या मार्गावरून जाणे असुरक्षित झाले आहे. या मार्गावरील सर्व बेकायदा वाहनांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करून रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यासाठी आम्ही वाहतूक पोलिसांकडे पाठपुरावा करत आहोत."

नगरसेवक निलेशदादा नेवाळे

​"नागरिकांची सुरक्षितता आणि सुविधा ही आमची प्राथमिकता आहे. सर्विस रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे परिसरातील महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करून योग्य त्या उपाययोजना राबवल्या जातील आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळवून दिले जाईल."
— नगरसेविका रिटा सानप

​"संबंधित सेवा रस्त्यावरील अनधिकृत अवजड वाहनांवर आमची कारवाई सुरू आहे. या भागात लवकरच अधिकृतपणे 'नो पार्किंग'चे फलक लावण्यात येणार आहेत. यानंतरही जर नियमांचे उल्लंघन करून कोणी वाहने पार्क केली, तर त्यांच्यावर आणखी कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल."

— रामचंद्र घाडगे
(वाहतूक पोलीस विभाग, तळवडे)

नात्यांपलीकडे जाऊन जपला मायेचा धागा
चिंचवड: रक्ताच्या नात्यांपलीकडे जाऊन समाजातील उपेक्षित घटकाला प्रेमाची आणि आपुलकीची ऊब देणे हीच खरी सणांची सार्थकता असते, याचा प्रत्यय चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये आला. वंचित, भटके आणि विमुक्त समाजातील मुलांच्या चेहऱ्यावर उत्सवाचा खरा आनंद फुलवण्याच्या उदात्त भावनेतून 'तत्वम सोशल फाउंडेशन'च्या वतीने गुरुकुलममधील तब्बल 350 मुला-मुलींसोबत अनोखा रक्षाबंधन सोहळा आणि स्नेहभोजनाचा संवेदनशील उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

उपक्रमादरम्यान फाउंडेशनने नेलेल्या  राख्यांनी वातावरण भावूक झाले होते. गुरुकुलममधील मुलींनी तेथील मुलांना मायेची राखी बांधली, तसेच उपस्थित फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनाही राखी बांधत अनोखा जिव्हाळा जपला. रक्षाबंधन हा केवळ रूढी परंपरेतील सण नसून समाजातील दुर्लक्षित घटकांप्रती वाटणारी माणुसकी, आदर आणि सामाजिक बांधिलकीची ती एक प्रतिज्ञा आहे, ही भावना यावेळी अधोरेखित झाली.

याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत व समाजसेवक पद्मश्री गिरीशकाका प्रभुणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी अशा आत्मीय उपक्रमांची नितांत गरज आहे. विशेषतः तत्वम फाउंडेशनच्या माध्यमातून सुशिक्षित तरुण वर्ग एकत्र येऊन सामाजिक जबाबदारीचे भान जपत असल्याबद्दल त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले, तसेच हे सेवाकार्य अविरत सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

तत्वम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र ठिकेकर म्हणाले की, सणांचा खरा आनंद हा समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांसोबत वाटून घेण्यातच असतो. या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच आमच्या सामाजिक कार्याची खरी ताकद असून, त्यांच्याशी जोडलेली ही नात्यांची आणि विश्वासाची वीण अधिक घट्ट करण्याचा आमचा निरंतर प्रयत्न राहील.

या भावूक सोहळ्यानंतर सर्व 350 मुलांसाठी अत्यंत प्रेमाने आणि तृप्तीने भरवलेल्या स्नेहभोजनाने (अन्नदान) मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलवले. या हृदयस्पर्शी उपक्रमासाठी तत्वम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र ठिकेकर, यांच्यासह सचिव वंदना चौहान, खजिनदार मनीषा पिसाळ यांच्यासह सदस्य आयुष चौहान, संदीप पिसाळ, श्रीराम घाटूळ आणि रजनी मांडले आदींनी विशेष परिश्रम घेतले.

वैफल्यग्रस्तांच्या मनाला धीर देणारा पदपथावरील आधार
मोशी: आयुष्याच्या वाटेवर संकटांनी घेरलेली, नैराश्य आणि प्रचंड मानसिक तणावाखाली वावरणारी अनेक माणसं आधाराच्या शोधात असतात. अशा हताश मनांना योग्य दिशा दाखवून टोकाचे पाऊल उचलण्यापासून रोखण्याचे अनोखे कार्य मूळचे कर्नाटक येथील ज्योतिष अभ्यासक नटराज आमले मागील बारा वर्षांपासून सातत्याने करत आहेत. सध्या पूर्णानगर परिसरातील पदपथावर बसून लोकांचे समुपदेशन करणाऱ्या आमले यांचे कुठेही कायमस्वरूपी वास्तव्य नसते; मात्र जिथे जातील तिथे तणावग्रस्त आणि गोरगरीब लोकांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतात.

ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन आमले केवळ भविष्य वर्तवत नाहीत, तर खचलेल्या मनांना उभारी देण्याचे महत्त्वाचे काम करतात. केवळ शास्त्र पाहिल्याने कोणाचेही नशीब किंवा भाग्य एका रात्रीत बदलत नाही; परंतु योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक विचारांमुळे व्यक्तीला मानसिक समाधान मिळते आणि कठीण काळात स्वतःला सावरण्याची ताकद मिळते, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. आयुष्यात आलेल्या अपयशाने खचून जाऊन कोणीही चुकीचा निर्णय किंवा टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी ते लोकांना विश्वासात घेऊन धीर देतात.

बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, पूर्वी लग्नकार्य, वास्तूपूजा अथवा कोणताही शुभ विधी करताना पंचांग आणि अचूक मुहूर्ताचा सखोल अभ्यास केला जात असे. आजच्या मोबाईलच्या जमान्यात राहू काळ किंवा इतर गोष्टी केवळ स्क्रीनवर पाहून लोक निर्णय घेतात. मात्र, शास्त्र आणि कुंडलीचे विश्लेषण हे अत्यंत सूक्ष्म अभ्यासाचा विषय असून ते संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनच समजून घेणे गरजेचे आहे. भौतिक सुखाच्या मागे धावताना निर्माण होणाऱ्या मानसिक कोंडीवर मात करण्यासाठी नटराज आमले पदपथावर राहूनही अनेकांच्या आयुष्याला आशेचा किरण दाखवत आहेत.

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल
पिंपरी, पुणे (दि.३० ऑगस्ट २०२६) | संघर्ष, साधना म्हणजे आशाताई भोसले, अशा महान व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत मोठा सन्मान आहे.  लतादीदी, आशाताई, हृदयनाथजी आणि उषाताई यांची गाणी ऐकून मी मोठी झाले. संगीतातील "सा" देखील यांच्यामुळेच शिकले. मी स्वतःमध्ये आशाताई आणण्याचा प्रयत्न करते. माझे पहिले मराठी भाषेतील गाणे ‘गणराज रंगी नाचतो’ हे रेकॉर्ड झाले तेंव्हा मी १३ वर्षाची होते. आशाताईंची गाणी ऐकून मला प्रेरणा मिळते. भाऊसाहेब भोईर यांच्या निमंत्रणाचा मी स्वीकार करते आणि लवकरच पिंपरी चिंचवड शहरासाठी एक सांगीतिक कार्यक्रम करेल असे आश्वासन आंतरराष्ट्रीय ख्यातीची गायिका श्रेया घोषाल यांनी "२१ वा आशा भोसले पुरस्कार" स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना दिले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल यावर्षीचा हा २१ वा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते शनिवारी, (दि. २९) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आमदार अमित गोरखे, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उद्योजक कृष्ण कुमार गोयल, नगरसेवक गौरव घुले तसेच मानसी भोईर- घुले, वंदना घांगूर्डे, रुणाल सांकला, दिलीप काटकर, हर्षवर्धन भोईर, किरण येवलेकर, राजू बंग, गौरी लोंढे आदी उपस्थित होते.  हा पुरस्कार रु. १,११,०००/- रोख, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते आणि पैठणी मानसी भोईर-घुले यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना प्रदान करण्यात आली.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी श्रेया घोषाल यांना आशीर्वाद देताना सांगितले की, श्रेयाला मी लहानपणापासून बघतो आहे सर्वप्रथम षण्मुखानंद हॉलमध्ये माझेच गाणे गाताना मी तिला पाहिले. तेव्हाच तिला तू खूप छान गाते, असा आशीर्वाद दिला आहे. आता भाऊसाहेब भोईर आमदार व्हावेत अशी इच्छा आहे. आ. अमित गोरखे यांनी सांगितले की, भाऊसाहेब भोईर हे या शहराचे सांस्कृतिक मंत्री आहेत. भोईर जर यापूर्वी भाजपमध्ये आले असते तर, आज ते राज्याचे सांस्कृतिक मंत्री झाले असते. अजूनही वेळ गेली नाही, असे म्हणतात प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट करून आ. गोरखे यांना प्रतिसाद दिला.

स्वागत, प्रास्ताविक करताना भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की,   या सांगीतिक प्रवासाचा श्वास लतादीदी आहेत, तर उच्छवास आशादीदी आणि याचे हृदय म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर आहेत. लता मंगेशकर यांना देश सन्मानाने दीदी म्हणतो तसेच आता श्रेया घोषाल या आमच्या "छोटी दीदी" आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात कार्यक्रम करण्यासाठी वेळ द्यावा असा आग्रह केला. याला श्रेया घोषाल यांनी देखील हात उंचावून होकार दर्शविला. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले की, आशा भोसले यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे पिंपरी चिंचवड शहराचा सन्मान आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम झाला. यावेळी श्रेया घोषाल यांच्या हस्ते मानसी भोईर-घुले यांच्या "मानसी रेस्कोर" या बँडचे अनावरण करण्यात आले. आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या गाजलेल्या सदाबहार गीतांची मैफलीचा रसिकांनी आनंद लुटला. यावेळी मानसी भोईर-घुले यांनी देखील गाणी गायली.

तसेच या पुरस्काराच्या गौरवशाली परंपरेची माहिती देणारी चित्रफीत सादर करण्यात आली. यामध्ये सन २००२ पासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेतर्फे हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार दिला जातो. यापूर्वी हा सन्मान गानकोकिळा स्व. लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पं. शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, डॉ. सलील कुलकर्णी आणि शान (शांतनू मुखर्जी) यांसारख्या संगीतातील दिग्गजांना प्रदान करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
पिंपरी : खासगी वाहनांवर परवानगीशिवाय ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिसांचे बोधचिन्ह किंवा लोगो वापरणाऱ्या वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत अशा २३ वाहनचालकांवर कारवाई करून ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत आहे. अधिकृत परवानगीशिवाय अशा प्रकारे पोलिसांची ओळख दर्शविणे नियमबाह्य आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर कारवाई केली जात आहे.

खासगी वाहनांवर पोलिसांचा लोगो का?

नियमांनुसार पोलिस विभागाचे अधिकृत बोधचिन्ह, चिन्हे किंवा ‘पोलिस’ असा मजकूर केवळ अधिकृत पोलिस वाहने किंवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी असलेल्या वाहनांवरच वापरता येतो. मात्र, काही खासगी वाहनचालकांकडून सर्रासपणे अशा चिन्हांचा वापर केला जात असल्याचे आढळून येत आहे.

अशा वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याबरोबरच या वाहनांचा गैरप्रकार किंवा गुन्हेगारी कृत्यांसाठी गैरवापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

काय सांगतो कायदा?

कायदा १९५० नुसार पोलिस बोधचिन्हाचा वापर कोणत्याही व्यापारी, व्यावसायिक किंवा जाहिरातीच्या उद्देशाने करता येत नाही. तसेच खासगी वाहनांवर अनधिकृत नामफलक, स्टीकर किंवा चिन्हे लावल्यास मोटार वाहन अधिनियम, १९८८ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत.

पोलिस असल्याचा धाक दाखवण्याचा प्रकार

काही प्रकरणांमध्ये अशा वाहनांचा अवैध कामांसाठी किंवा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी वापर होण्याची शक्यता आहे. पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या अथवा नातेवाइकांच्या वाहनांवरही पोलिसांचे नाव किंवा लोगो लावल्याचे प्रकार आढळतात.

पोलिस असल्याचा धाक दाखवून प्रवासी वाहनांचा वापर होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि वाहन तपासणीदरम्यान अशा वाहनांकडे दुर्लक्ष होत असल्याने काही ठिकाणी हा प्रकार वाढत असल्याचे दिसून येते.

विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड यांनी सांगितले,
“पोलिसांचे बोधचिन्ह खासगी वाहनावर लावण्याची परवानगी नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जात आहे. ऑगस्ट महिन्यात २३ वाहनचालकांवर कारवाई करत ११ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.”

चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
पुणे : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासनाने पायाभूत सुविधांच्या विकासासह वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यावर भर दिला आहे. उद्योजकांच्या अडचणी दूर करून उद्योगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तळेगाव आणि चाकण येथे भेट देत रस्ते दुरुस्तीच्या कामांची पाहणी केली. तसेच चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

वाहतूक कोंडीवर तातडीने काम

चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीच्या विविध ठिकाणांची पाहणी करून शिंदे यांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला. पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी एम-६० हार्डनरचा वापर केला जात आहे. तसेच रस्त्यांवर थेट कास्टिंग केलेले पॅचेस बसवण्याचे काम सुरू आहे.

जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आणि एम-६ आरएमसी विथ हार्डनरच्या माध्यमातून खड्डे कमी वेळेत दुरुस्त करून अवजड वाहतूक तातडीने सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वाधिक खराब झालेल्या ठिकाणी प्री-कास्ट पॅनेल बसवण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.

दर शुक्रवारी विशेष नोडल समितीची बैठक

औद्योगिक क्षेत्रातील समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आता दर शुक्रवारी होणार आहे.

रस्ते, ड्रेनेज, फुटपाथ आणि स्ट्रीट लाईट्ससह औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासावर या समितीमार्फत विशेष लक्ष दिले जाणार आहे.

५४ किमी मार्गाच्या दुरुस्तीला गती

तळेगाव ते शिक्रापूर या ५४ किलोमीटर मार्गाच्या दुरुस्तीला गती देण्यात येणार आहे. यासोबतच नाशिक फाटा-राजगुरुनगर रस्ता आणि औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची कामेही वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

रस्ते विकास करताना फुटपाथ, युटिलिटी आणि सायकल ट्रॅकचा समावेश करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

कामगारांसाठी वसाहती आणि मेट्रोचा विस्तार

औद्योगिक क्षेत्रात कामगारांचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी क्लस्टरच्या माध्यमातून कामगार वसाहती उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, निगडी-चाकण, चाकण-राजगुरुनगर आणि तळेगाव-शिक्रापूर या मेट्रो मार्गांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश महामेट्रोला देण्यात आले आहेत.

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी उपलब्ध

उद्योजकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंते आणि अन्य अधिकारी आठवड्यातून एक दिवस प्रत्यक्ष उपलब्ध राहणार आहेत. उद्योजकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी ‘मैत्री’ ॲपचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय वीज ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे, लोडशेडिंगचे नियोजन, स्वतंत्र एजन्सीमार्फत कचऱ्याची विल्हेवाट, तसेच पाणीपुरवठा आणि पोलीस प्रशासनाशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्णय बैठकीत घेण्यात आले.

उद्योग स्थलांतराचा निर्णय बदलण्याची चिन्हे

शासनाच्या उपाययोजनांमुळे चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्यांवर तोडगा निघण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उद्योग बाहेर स्थलांतरित करण्याबाबत उद्योजकांच्या भूमिकेतही सकारात्मक बदल झाल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.

भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
भोसरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या  विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालय, भोसरी येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या जयघोषात ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर एमएसएफ (MSF) जवानांनी सादर केलेले शिस्तबद्ध संचलन उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

याप्रसंगी क क्षेत्रीय अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधताना देशाच्या प्रगतीसाठी स्वातंत्र्य मूल्यांची जपणूक आणि मूलभूत कर्तव्यांच्या पालनावर विशेष भर देण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे पूर्ण झाली असली, तरी दैनंदिन जीवनातील मूलभूत नागरी कर्तव्ये पार पाडणे हीच खरी देशसेवा असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, रस्त्यावर कुठेही कचरा न टाकता त्याचे योग्य वर्गीकरण करून तो कचरा गाडीतच देणे, अशा छोट्या-छोट्या नियमांचे नागरिकांनी पालन केले पाहिजे, असे  आवाहन यावेळी त्यांनी आले.

तसेच, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी अधिकारी व नागरिकांमधील संवाद महत्त्वाचा असून, सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांची कामे मोकळ्या मनाने व योग्य रीतीने वेळेत पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने योगदान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
पिंपरी-चिंचवड, दि. १५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्य दिनानिमित्त निगडी येथील भक्ती-शक्ती परिसरात आयोजित विविध देशभक्तीपर कार्यक्रमांमुळे राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले. Youvan संस्था आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन तसेच महानगरपालिकेच्या वतीने आयोजित देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमास महापौर रवि लांडगे यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेचा स्वर — ‘वंदे मातरम्’

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमान जागविणारे प्रेरणागीत ठरले. स्वातंत्र्य चळवळीच्या विविध टप्प्यांवर या गीताने देशवासीयांना एकत्र आणत मातृभूमीप्रती समर्पणाची भावना दृढ केली. या ऐतिहासिक वारशाचे स्मरण आणि नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व कर्तव्यभावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले होते.

नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘वंदे मातरम्’चे सामूहिक स्वर भक्ती-शक्ती परिसरात घुमले. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल महापौर लांडगे यांनी YOUVAN संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अभिनंदन केले.

देशभक्तीपर गीतांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित

याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात विविध कलाकारांनी राष्ट्रप्रेम जागविणाऱ्या गीतांचे सादरीकरण केले. महापालिकेतील प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच संगीत आणि गायनाची आवड जोपासणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध झाल्याबद्दल महापौर लांडगे यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमात बालकलाकार ‘वंडर बॉय’ पृथ्वीराज सतीश इंगळे याने ‘मेरा जूता है जापानी’ हे गीत सादर केले. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण आणि सुरेल सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महापौर लांडगे यांनी पृथ्वीराजचे विशेष कौतुक करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“राष्ट्रप्रेमासोबत राष्ट्रविकासाची जबाबदारीही रुजली पाहिजे” — महापौर रवि लांडगे

“स्वातंत्र्य दिन हा स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक स्वरांतून राष्ट्रप्रेम, एकात्मता आणि मातृभूमीप्रती असलेली कृतज्ञता अधोरेखित होते. नव्या पिढीच्या मनात राष्ट्रप्रेमासोबत राष्ट्रविकासातील आपली जबाबदारीही दृढ व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व आहे.”

— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसदस्य पंकज भालेकर, अतिश बारणे, जनता व संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह Youvan संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, कलाकार, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या दोन्ही उपक्रमांतून राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि नव्या पिढीचा सहभाग यांचा प्रभावी संगम अनुभवायला मिळाला.