Manisha Thorat- Pisal - News Express Marathi

‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी : ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी टप्पा आहे. उत्पादन, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्र $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असून, या प्रवासात उद्योग क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,’’ असे प्रतिपादन ‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योजक भरत गीते यांनी केले.

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग, समाजसेवा आणि प्रेरणादायी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक्सप्रेस मीडिया इंटरप्राईसचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात  के. राहूल यांच्या गायनाने झाली, त्यानंतर गुरुवर्य ॲकॅडेमी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली.

सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले, त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांमध्ये  जेष्ठ अभिनेते व नाम फाऊंडेशनचे संस्थापक मा. मकरंद अनासपुरे, संसदरत्न खासदार मा. श्रीरंग बारणे, महापौर रवी लांडगे, प्रमुख प्रायोजक कुमार लाईफस्पेसेसचे संचालक मा. अमेय जैन आणि उद्योगक्षेत्रातील मा. भरत गीते, महावितरण चे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, शिवसेनेचे मुख्य सचिव वैभव थोरात, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष कविता अल्हाट, नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांचा समावेश होता. यावेळी उद्योजक भारत गीते यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या मुलाखतीमध्ये उपस्थित विद्यार्थी, श्रोत्यांना प्रेरणा मिळाली.

सोहळ्यात उद्योगक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उद्योजक आणि ‘‘ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’’ म्हणून ओळखले जाणारे मा. भरत गीते यांना महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर उर्वरित विशेष पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

संचालिका मनीषा थोरात-पिसाळ यांनी आपल्या भाषणात संस्थेची ओळख, सामाजिक बांधिलकीसाठी पुरस्काराचे महत्त्व, कुटुंबाचा आधार आणि प्रेरणादायी संदेश यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, दृढनिश्चय, प्रामाणिकपणा, मेहनत आणि समाजासाठी योगदान हेच खरे यश निर्माण करतात. तसेच उपस्थितांना संदेश दिला की, प्रत्येक अडचणीत धैर्याने सामना करावा आणि मेहनत व विश्वासाने स्वप्न पूर्ण करावेत.

सोहळ्यात रमा-मंगल फाउंडेशनचे संस्थापक संतोष सौंदणकर यांच्यासह  अनेक मान्यवरांचे सहकार्य होते. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक कुमार लाईफ स्पेसेस, विठ्ठल हॉस्पिटल मोशी, धनश्री हॉस्पिटल, लोटस ग्रुप, रिव्हर नेस्ट, पार्श्व रिॲलिटी, वृंदा लाईफस्पेसेस, सोनिगरा क्रॉप अशा प्रमुख प्रायोजकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी जेष्ठ अभिनेते मा. मकरंद अनासपुरे,  महापौर रवी लांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर आभार प्रदर्शन मा. संतोष सौंदणकर यांनी केले. सोहळा प्रेरणादायी ठरला आणि समाजातील प्रेरक व्यक्तिमत्त्वांचा योग्य सन्मान करण्यात यश मिळाले.

पुरस्कारार्थींची नावे पुढीलप्रमाणे :

भरतजी गीते (महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार), वैभव थोरात (शिक्षणमहर्षी), विठ्ठल हॉस्पिटल, मोशी (महाराष्ट्र धन्वंतरी गौरव पुरस्कार), रविंद्र दत्तात्रय ठिकेकर (यशस्वी उद्योजक पुरस्कार), संदीप बेलसरे (उद्योग नवोन्मेष पुरस्कार), सुनील काकडे (मुख्य अभियंता महावितरण) (कार्यगौरव पुरस्कार), नितीन सूर्यवंशी (कार्यगौरव पुरस्कार), दीपक अशोक माने (सामाजिक कार्यगौरव),  डॉ. जयश्री सुरवसे (द्रोणाचार्य पुरस्कार), ज्योत्स्ना भूषण मावळे (मानसशक्ती पुरस्कार), नवनाथ ढवळे (शिक्षण रत्न पुरस्कार), वंदना चौव्हाण (नारीशक्ती कार्यगौरव), मराठवाडा युवा मंच (सामाजिक कार्यगौरव), समर्थ महिला बहुउद्देशीय (महिला सशक्तीकरण कार्यगौरव), नीता पाडाळे (आदर्श नगरसेविका),  प्रिती बोंडे(उत्कृष्ट व्यक्तिमत्व), केसर ग्रुप (उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक), विश्वकल्याण इंग्लिश मिडीयम स्कूल (ज्ञानदीप गौरव पुरस्कार), जाणीव परिवार (मोशी) (सामाजिक कार्यगौरव), आपला परिवार सोशल फाउंडेशन (पर्यावरण संवर्धन कार्यगौरव), शिवयोद्धा ग्रुप (महाराष्ट्र शिवविचार गौरव).

"उद्योग म्हणजे फक्त नफा नाही; ते समाजासाठी, लोकांसाठी आणि पुढील पिढीसाठी नवीन संधी निर्माण करण्याचे माध्यम आहे. दृढनिश्चय, प्रामाणिकपणा आणि मेहनत यांवर टिकून राहिल्यास यश आपोआप आपल्यासमोर येते."
- भरत गीते, महाराष्ट्र उद्योग भूषण.

"जगण्यासाठी फक्त स्वप्ने पाहणे पुरेसे नाही, ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न, धैर्य आणि समाजाची सेवा आवश्यक आहे. प्रत्येक कृतीत समाजाला काही तरी देण्याचा विचार असावा, मग यश आपोआप पाठलाग करते."
- मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ अभिनेता.

मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे
पिंपरी- चिंचवड: शहरात किती विकास कामे केले, नवीन प्रकल्प राबविले यापेक्षा पाणी, स्वच्छता, आरोग्य, स्वच्छता या मुलभूत सुविधा किती सक्षमपणे दिल्या जातात हे महत्वाचे आहे. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांपेक्षा मुलभूत सुविधा मुबलक प्रमाणात देण्यावर भर द्यावा. नागरिकांना पुरेसे, स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. रावेत, निघोजे बंधाऱ्यातून उचलण्यात येणारे पाणी अतिशय अशुद्ध आहे. त्यामुळे शिवणेतील बंधाऱ्यातून पाणी उचलण्यात यावे, असे निर्देश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात खासदार बारणे

यांनी सोमवारी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, मुख्य लेखा आधिकारी प्रविण जैन, उपायुक्त ममता शिंदे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे,  संजय कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्षण गोफणे, नगररचना उपसंचालक  किशोर गोखले, सह आयुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता बापू गायकवाड, सुनिल भागवानी, मनोज शेटीया, अनिल भालसाकळे, प्रेरणा सिनणकर, वायसीएमचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे, उद्यान अधिकारी महेश गारगोटे, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, महापालिका गटनेते विश्वजीत बारणे, नगरसेवक निलेश तरस, नगरसेवक निलेश बारणे, नगरसेविका ऐश्वर्या तरस, बापू कातळे उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, महापालिकेकडून रावेत बंधाऱ्यातून उचलण्यात येणारे पाणी अतिशय अशुद्ध आहे. देहूरोड, किवळे भागातील नाले नदीला मिळत आहेत. काही सोसायट्यांमधील सांडपाणीही थेटपणे नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे अशुद्ध पाणी होत आहे. महापालिका पवना धरणातू ५५० एमएलडी पाणी उचलते. पाणी उचलणे, शुद्धीकरणाची क्षमता नसल्याने जास्त पाणी उचलणे वाढविण्यात येत नाही. रावेत येथील पाणी अशुद्ध झाल्याने शिवणे बंधाऱ्यातून पाणी उचलण्याबाबत चाचपणी करावी. महापालिकेने तिथे गेट उभारले आहे. त्यामुळे भविष्यात तेथून पाणी उचलावे. अन्यथा सांडपाणी मिश्रित पाणी नागरिकांना मिळेल. आंद्रा धरणातील शंभर एमएलडी पाणी निघोजे बंधाऱ्यातून उचलण्यात येते. हे पाणी रावेतपेक्षा अशुद्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे शहराला अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी उपाययोजना कराव्यात. टँकर बंद झाले पाहिजेत. पुरेशा दाबाने आणि स्वच्छ पाणीपुरवठा करावा. सांडपाणी वाहिन्यांची वेळेवर साफसफाई केली जाते. त्यामुळे पाणी साचते. पावसाळ्यापूर्वी सांडपाणी, पावसाळी पाणी वाहिन्या स्वच्छ कराव्यात. अनेक ठिकाणी चेंबर्स घुशीने पोखरले आहेत. १८५ किलोमीटर अंतर ड्रेनेजलाईनमधून पिण्याची पाण्याची पाईपलाईन गेली आहे. त्यामुळे थेट अशुद्ध पाणी नागरिकांना दिले जात आहे. त्यामुळे या पाणी पाईपलाईन बदलणे आवश्यक आहे.

बांधकाम विभागातील टेबल कमी करा...

बांधकाम विभागात प्रत्येक टेबलवर दोन टक्के घेतल्याशिवाय फाईल पुढे जात नाही. त्यामुळे टेबल कमी करावेत. बांधकाम परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरु करावी. त्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही. बांधकाम विकसक, नागरिकाला तत्काळ परवानगी मिळाली पाहिजे. जो भाग नव्याने विकसित झाला आहे. त्या भागात पाणी, वीज, स्वच्छता या सुविधा देण्याची सूचनाही खासदार बारणे यांनी केली.

बांधकाम विकसकांकडून उद्याने विकसित करुन घ्या...

उन्हाळ सुटीत महापालिका शाळांवरील पाणी टाक्या स्वच्छ कराव्यात. स्वच्छतागृहे, परिसर स्वच्छ करावा. मैदानावर ब्लॉक बसविल्याने मुलांचा मातीशी संपर्क कमी केला आहे. मातीशी संपर्क राहू द्यावा. शाळांमध्ये पाणी फिल्टर, जीम करायची असल्यास त्याची यादी द्यावी. सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करुन दिली जाईल. शहरातील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. एकही गार्डन व्यवस्थिती नाही, लॉन नाही. ठेकेदार राजकीय लोकांशी संबंधित असतात. बांधकाम विकसक चौक विकसित करतात. त्याचप्रमाणे उद्याने विकसित करुन घ्यावीत. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावरच ठेवावी. त्यासाठी विकसकांची तयारी आहे. उद्यानाला महापालिकेचे नाव ठेवावे. त्यासाठी बांधकाम विकसकांची बैठक घ्यावी. त्यांची कामे तत्काळ केली, तर तेही महापालिकेला मदत करतील, असेही ते म्हणाले.

प्रभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करा...

प्रभाग स्वतरावरील अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या कामांची दखल घेतली जात नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे प्रभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी. लोकप्रतिनिधींबरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या ऐकले पाहिजे. महापालिका रुग्णालयांमध्ये ३५ टक्के शहराबाहेरील रुग्ण उपचार घेतात. कोणावर उपचार करण्यास विरोध नाही. पण, शहरातील करदात्यालाही दर्जेदार उपचार मिळाले पाहिजेत. खासगी रुग्णालयांना धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार दहा टक्के बेड राखीव ठेवावे लागतात. महापालिका हद्दीत २० रुग्णालये आहेत. हे रुग्णालये शासकीय योजनांचा रुग्णांना फायदा देत नाहीत. त्याचे ऑडीट करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत किती रुग्णांना लाभ दिला, किती जणांना मोफत उपचार दिले, याची माहिती घ्यावी. गरीब रुग्णांना उपचार दिले जातात का, याची तपासणी करावी. काही रुग्णालये वसुली केंद्र झाली आहेत. रुग्णांची लूट करतात. त्याची तपासणी करावी, असेही ते म्हणाले.

मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा...

शहरात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांबरोबर घेऊन श्वानांसाठी संगोपण केंद्र करता येईल का याचा अभ्यास करावा. त्यासाठी उपाययोजना कराव्यात. मोकाट, पाळीव श्वानांना जीपीएस सिस्टीम बसवावी. कोणता श्वान कुठे जातो, कोणाला चावा घेतला आहे त्याची माहिती मिळेल. रेबीज इंजेक्शन द्यावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी : शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती आणि पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारणे तितकेच महत्त्वाचे आहे. मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील हा अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्प स्थानिक युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी उपयुक्त ठरणार असून, परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी, बोऱ्हाडेवाडी येथील गट क्र. २३० व २३१ मध्ये विकसित करण्यात येणाऱ्या अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचे भूमिपूजन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिका विधी समिती सभापती सुजाता बोराटे,माजी महापौर तथा नगरसदस्य राहुल जाधव, निखिल बोऱ्हाडे, नगरसदस्या सारिका बोऱ्हाडे आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता विजय जाधव, बाळासाहेब लांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच निलेश बोराटे,आतिश बारणे, शिवाजी बारणे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसर झपाट्याने विकसित होत असताना येथील नागरिक,युवक-युवती, महिला तसेच लहान मुलांसाठी सुसज्ज सार्वजनिक जागेची आवश्यकता लक्षात घेऊन महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना केवळ मनोरंजन व विरंगुळ्याचीच नव्हे, तर आरोग्यदायी जीवनशैलीकडे वाटचाल करण्यासाठीही मोठा आधार मिळणार आहे.असेही त्यांनी सांगितले.
या अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पासाठी २ कोटी ७२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून एस.एस. आर्किटेक्टस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी ९ महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

....अशा आहेत सोईसुविधा

या अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पामध्ये नागरिकांसाठी व्हॉलीबॉल कोर्ट (४८० चौ.मी.), योगा कोर्ट (१६० चौ.मी., बॅडमिंटन कोर्ट (३५० चौ.मी.), सॅन्ड पिट (जंगल जिम) (१०० चौ.मी., बहुउद्देशीय मैदान (१५५० चौ.मी.), अम्पिथिएटर, पादचारी मार्ग , बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह आणि पार्किंग यांसारख्या विविध आधुनिक व उपयुक्त सुविधा विकसित करण्यात येणार आहेत त्यामुळे हा प्रकल्प सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आकर्षणाचे व उपयुक्ततेचे केंद्र ठरणार आहे. स्थानिक तरुणांना खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सार्वजनिक परिसर उपल

ब्ध होणार असल्याने सामाजिक संवाद, आरोग्यवर्धन आणि सकारात्मक वातावरण निर्मितीस चालना मिळणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसराचा केवळ भौतिक विकास होणार नसून, आरोग्य, क्रीडा, सामाजिक एकात्मता आणि जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुविधा, आनंद आणि सक्रियता वाढविणारा हा प्रकल्प मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरासाठी विकासाचा नवा टप्पा ठरणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
पिंपरी :   चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक असा अभिनव व समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पिंपळे सौदागर परिसरात नागरिकांना १००० वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले.

वाढदिवसाचे औचित्य साधत समाजासाठी काहीतरी सकारात्मक व शाश्वत योगदान देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमातून “एक व्यक्ती – एक वृक्ष” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात आली. वाढत्या

PCMC

नागरीकरणामुळे कमी होत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करण्यात आली. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे म्हणाले की, “आमदार शंकर भाऊ जगताप हे केवळ लोकप्रतिनिधी नसून जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्याने झटणारे कार्यसम्राट आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत समाजहिताला नेहमीच प्राधान्य असते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्ष वाटपासारखा उपक्रम राबवून त्यांच्या कार्याला साजेसा आणि समाजासाठी उपयुक्त संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आज लावलेला प्रत्येक वृक्ष हा भविष्यातील पर्यावरणाचा मजबूत पाया ठरेल.”

तसेच उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. कुंदा संजय भिसे यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “आमदार शंकर जगताप यांची काम करण्याची धडाडी, जनसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टी ही खरोखर प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांना गती मिळाली आहे. त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविला. शहराचा विकास करताना पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज आहे, आणि अशा उपक्रमांमधून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

या उपक्रमाद्वारे आमदार शंकर जगताप यांना ‘निसर्ग आरोग्यदायी शुभेच्छा’ देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश व्यापक स्वरूपात समाजात पोहोचविण्यात आला. सदर उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, पर्यावरण रक्षणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

याप्रसंगी उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, उन्नती फाउंडेशन सभासद, ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन, लिनियर गार्डन जेष्ठ नागरिक संघ, आनंद हास्य क्लब, विठाई वाचनालय, यांच्यासह पिंपळे सौदागर , रहाटणी मधील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्लास्टिकचा कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सृजन सायन्स सेंटर देवरुख तर्फे करण्यात आले आहे.

प्लास्टिकमुक्त शहर स्वच्छतेचा ध्यास या युक्तीप्रमाणे ही स्पर्धा होणार आहे. प्लास्टिकमुळे वाढणारे प्रदूषण कमी करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पुनर्वापर व पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धकांनी त्यांच्या परिसरातील रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक कचरा व रॅपर्स गोळा करायचे आहेत. हे सर्व प्लास्टिक प्रत्येक रिकाम्या बाटलीत भरायचे आहे. या भरलेल्या बाटल्या सृजन सायन्स सेंटरमध्ये जमा करायच्या आहेत.

ज्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक प्लास्टिक संकलन केले असेल त्या पहिल्या २५ विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी स्पर्धकालाही बक्षिसे देण्यात येतील. जमवलेल्या प्लास्टिकपासून उपयुक्त वस्तू बनविण्यात येणार आहेत. हा उपक्रम सायन्स सेंटरमध्येच राबवला जाणार आहे. यासाठी सर्व प्लास्टिक १ नोव्हेंबर रोजी स्थळ सृजन सायन्स सेंटर देवरुख येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेतच जमा करावयाचे आहे. या अनोख्या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.

परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
सप्टेंबर महिन्यात पावसाने दाखविलेली अवकृपा आता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही कायम ठेवली आहे. सततच्या पावसाने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाळा हंगाम संपला तरी सतत पाच दिवस पाऊस पडत असल्याने काहींनी कापून ठेवलेले भातशेती वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस पाठ सोडायला तयार नसल्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे मातीमोल झाले आहे. यात पावटा,कुळीथ,तुर या प्रमुख पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने उभी पिके कुजून गेली आहेत. काढणी करून ठेवलेली शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, ऑक्टोबर संपत आला तरी, पावसाचे संकट थांबण्याचे नाव घेत नसून पाच दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचले आहे. वायंगणी शेती पाण्यावर तरंगत आहे. भात पिकांची प्रचंड नुकसान झाले असून पिके वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. ही भरपाई कधी मिळणार याची शाश्वती नाही. त्यामुळे आता तरी पावसा थांब रे बाबा, बस झाले, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
लहान विद्यार्थ्यांना तसेच अगदी मोठ्या माणसांना देखील अवकाशाबद्दल नेहमीच कुतूहल असते. हे कुतूहल अधिक जागृत व्हावे आणि त्यातून अवकाश विज्ञान सोप्या पद्धतीने कळावे यासाठी देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात चार नवीन मॉडेल्स आणण्यात आली असल्याची माहिती देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली.

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र प्रतिकृती

या मॉडेल मधून पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण, ऋतू, दिवस-रात्र, ग्रहणे, अमावास्या आणि पौर्णिमा, चंद्राची कक्षा, अधिक महिना, राशी संक्रमण, चंद्र महिना अशा मूलभूत संकल्पना विषद होतात.

तिथी मॉडेल

हे मॉडेल आहे तिथी आणि नक्षत्रे या विषयाची प्रतिकृती आहे. हे चंद्र सूर्य व पृथ्वी यांच्या गतीवर आधारित भारतीय पंचांगातील काही संकल्पना स्पष्ट करते जसे शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, सूर्याचे नक्षत्र स्थान, सायन व निरयन.

अभिमुखता मॉडेल

पृथ्वीची परांचन गती समजून घेण्यासाठी हे मॉडेल मदत करते. आताचा ध्रुव तारा काही हजार वर्षांनंतर त्या ठिकाणी रहाणार नाही. तसेच पंचांगातील महिन्यांची नावे देण्याचा नियम पण यामुळेच बदलावा लागेल. ‘विषूव बिंदू’ दर ७२ वर्षांनी एक अंश कसा सरकतो हे या प्रतिकृतीतून बघता येते.

राहू केतू मॉडेल

राहू व केतू या संकल्पनेचे खगोलीय स्पष्टीकरण ही प्रतिकृती करते. राहू व केतू ज्या कक्षेत फिरतात ती पण बदलत असते. एक फेरी पूर्ण व्हायला १८.६ वर्षे कशी लागतात हे कळते तसेच ग्रहणे समजण्यासही ही प्रतिकृती मदत करते.

ही सर्व मॉडेल्स सुप्रसिद्ध अवकाश अभ्यासक रवींद्रजी गोडबोले यांनी थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने बनवलेली आहेत. सृजन विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी कटीबद्ध आहे. या मॉडेल्सच्या माध्यमातून विज्ञान केंद्रामध्ये लवकरच अवकाश विषयीची वर्कशॉप्स सुरू करण्यात येणार आहेत त्याचा लाभ कोकणातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन सदानंद भागवत यांनी केले आहे.

किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयमुळे नोकऱ्यांमध्ये उलथापालथ झाली आहे. यामुळे अनेक कंपन्यांमध्ये नोकरदार कपात होऊ लागली आहे. तसेच एआयचा वापर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही तर, आता वैद्यकीय आणि नातेसंबंधांच्या सल्ल्यासाठी एआय वापरले जात आहे. अलिकडच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, एआयचे वैयक्तिक स्वरूप किशोरवयीन मुलांना आकर्षित करत असून तरुणाईमध्ये एआयची जादू दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

अमेरिकेत एका शाळेतील मुलांचा सर्व्हे करण्यात आला. त्यात एक तृतियांश मुलं एआयला आपला मित्र समजून गप्पा मारतात. हे चिंताजनक आहे. मेल अलाईज यूकेने थेरपी किंवा थेरपिस्ट म्हणून लेबल असलेल्या चॅटबॉट्सच्या वाढत्या ट्रेंडबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कॅरेक्टर एआय द्वारे उपलब्ध असलेल्या सर्वात लोकप्रिय चॅटबॉट्सपैकी एक आहे. त्याला एका वर्षात 7 कोटी 80 हजार संदेश मिळाले. ही संस्था एआय गर्लफ्रेंडच्या वाढत्या ट्रेंडबद्दल देखील चिंतित आहे. ज्यामध्ये युजर्स त्यांच्या ऑनलाइन जोडीदाराच्या दिसण्यापासून ते त्यांच्या वर्तनापर्यंत सर्वकाही वैयक्तिकरित्या निवडू शकतात. इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्सच्या 37 शाळांमध्ये केलेल्या सर्व्हेक्षणात 53 टक्के अल्पवयीन मुलांचे म्हणणे आहे की, त्यांना वास्तविक दुनियेपेक्षा ऑनलाईन जग जास्त आवडते.

हे संशोधन अशा वेळी आले आहे जेव्हा लोकप्रिय आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉट स्टार्टअप character.ai ने किशोरांना त्यांच्या AI चॅटबॉट्सशी खुले संभाषण करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. याचा वापर लाखो लोक वैद्यकीय आणि रोमँटिक माहितीसाठी करत होते.

सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
महाराष्ट्राला परतीच्या पावसाने मोठा फटका दिला. मराठवाड्यात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरपरिस्थितीने शेतजमिनीच पाहून गेल्या आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसून शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. आता सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. अकोला येथील शेतकऱ्यांनी 5,8, 13 रुपये अशी मदत करण्यात आली आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यात शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले, शेतकऱ्यांना मदत मिळणे दूरच उलट प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांची अहवेलना करण्यात आली आहे. अकोला येथील शेतकऱ्यांना ५ रुपये, ८ रुपये, १३ रुपये अशी मदत करण्यात आली आहे. याला जखमेवर तिखट चोळणे म्हणतात. एकीकडे हातातील पीक केलं, जे आहे त्या शेतमालाला भाव मिळत नाही जे नुकसान झालं त्याचा विमा असा पाच रुपये मिळणार असेल तर शेतकरी जगणार कसा? शेतकऱ्यांना मदत सोडा पण त्यांचा असा अपमान करू नका, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
मतदार यादीतील घोटाळा, निवडणूकप्रक्रियेतील गोंधळ या विरोधात मुंबईत सर्वपक्षांकडून 1 नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर या सत्याचा मोर्चाबाबत माहिती देण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी या मोर्चाबाबत माहिती दिली.

मतदार यादीतील गोंधळ, निवडणूक प्रक्रियेतील घोटाळा या विरोधात असलेले सर्व पक्ष आणि मतदार या मोर्चात सहभागी होणार आहे. हा मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट येथून निघणार आहे आणि मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल. या मोर्चात महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते, मनसेप्रमुख राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, डाव्या पक्षांचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असून ते मोर्चाला मार्गदर्शन करणार आहे. या मोर्चाला लाखोंच्या संख्येने उपस्थिती असेल, असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केला.

केवळ राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबतच आपले मत चोरीला गेले आहे आणि चुकीच्या पद्धतीने हे सरकार सत्तेत आले आहे, असे ज्यांना वाटते, ती जनताही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. या मोर्चाबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. त्यांच्याकडून आवश्यक त्या सूचना घेतल्या आहेत. मोर्चाचे रुट प्रसिद्धीकरता देण्यात आले आहे. आमच्या आणि मतदारांच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. मतदारयादीतील घोळ दूर करण्यात यावे, ही प्रमुख मागणी आहे.

सर्वसामान्य मुंबईकरांचा विचार करत मोर्चा शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. तसेच दुपारी 1 ते 4 या वेळेत मोर्चा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. हा मोर्चा शांततेत पार पडणार असून या मोर्चात प्रमुख नेते मतचोरी, मतदान यादीतील घोटाळा याबाबत पुढील आंदोलनाची चर्चा करत त्याची माहिती देणार आहेत, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.

तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल
अनेकदा आपण काही कारणास्तव जास्त जेवण बनवून ठेवतो किंवा काहीवेळेला आपल्याकडून ते बनवलं जातं.मग आपण उरलेलं जेवण फ्रिजमध्ये ठेवतो. जसं की भाजी-भाता असेल तर तो आपण फ्रिजमध्ये ठेवतो. आणि दुसऱ्या दिवशी ते गरम करू न खातो. पण अनेकदा फ्रिजमधून काढल्यानंतर पदार्थ गरम करून खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. तसेच त्या पदार्थांमधील पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते आणि काही पदार्थ विषारी देखील बनू शकतात.

फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाणे योग्य आहे का?

खास करून भातासंदर्भात असं बोललं जातं की शिळा भात फ्रिजमध्ये ठेवला असेल तर तो पुन्हा गरम करू नये नाहीतर त्यातील पौष्टिक मूल्य कमी होतात. भात शिजवल्यावर 24 तासांनंतर त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे तो भात विषारी बनू शकतो. तसेच फ्रिजमध्ये ठेवलेला भात जेव्हा पुन्हा गरम करून खाल्ला जातो तेव्हा त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात परंतु त्याच्यातील विषबाधा होऊ शकतील असे घटक मात्र तसेच राहतात. त्यामुळे भात एकादिवसापेक्षा किंवा एका रात्रीपेक्षा जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवून मग तो गरम करून खात असाल तर आत्ताच थांबा. त्याआधी त्यामुळे होणारे नुकसान लक्षात घ्या.

फ्रिजमधू काढून पुन्हा गरम केलेला भात खाण्याचे तोटे

अन्नातून विषबाधा होऊ शकते

पुन्हा गरम केलेला भात खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते. भात थंड झाल्यावर त्यात बॅसिलस सेरियस नावाचे जीवाणू वाढतात. पुन्हा गरम केल्याने जीवाणू नष्ट होतात, परंतु त्याचे जीवाणू भातातच राहतात, ज्यामुळे भात एकप्रकारे विषारी बनतो. जेव्हा हा भात खाल्ला जातो तेव्हा हे विष अन्नातून विषबाधा निर्माण करू शकते.

पोटाच्या समस्या

संशोधनानुसार, जर शिजवलेला भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला नाही तर त्यात बॅक्टेरिया लगेच वाढू शकतात. भात पुन्हा गरम केल्यानंतरही हे बॅक्टेरिया त्यात टिकून राहू शकतात. जेव्हा बॅक्टेरिया वेगाने वाढतात तेव्हा ते विषारी पदार्थ तयार करतात आणि पोटाच्या समस्या निर्माण करू शकतात. हे टाळण्यासाठी, भात शिजवल्यानंतर कधीही खोलीच्या तपमानावर जास्त काळ ठेवू नका. भात शिजवल्यानंतर लगेच खाणे चांगले. आणि फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर तो एका दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवून खाऊ नका.

पचनक्रिया बिघडू शकते

भात पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात, ज्यामुळे ते कमी पचतात आणि पोटदुखी होऊ शकते. ज्यांना पचनाचा जास्त त्रास होतो. त्यांनी कधीही पुन्हा गरम केलेला भात खाऊ नये. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

अमेरिका-चीनमध्ये व्यापार करार; सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण
अमेरिका-चीनमध्ये व्यापार करार झाल्यामुळे अचानक सोने २००० रुपयांनी स्वस्त झाले आणि चांदीच्या किमतीतही १६०० रुपयांनी घसरण झाली. सोने-चांदीच्या किमतीत बुधवारी सुधारणा झाली होती. मात्र, गुरुवारी वायदे बाजार सुरु होताच दोन्हींच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. एमसीएक्सवर सोने अचानक 2000 रुपयांनी घसरले, तर चांदी 1600 रुपयांपेक्षा जास्त घसरली.

दक्षिण कोरियातील बुसान येथे डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान टॅरिफसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. याचा थेट परिणाम सोने आणि चांदीच्या किमतींवर झाला. त्यांच्या किमतींमध्ये पुन्हा लक्षणीय घसरण दिसून आली आहे. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर व्यवहार सुरू होताच सोन्याचा दर सुमारे २,००० ने घसरला, तर चांदीचा दर १,६०० पेक्षा जास्त घसरला. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या तीव्र घसरणीनंतर बुधवारी किमती थोड्या वाढल्या होत्या. मात्र, गुरुवारी बाजार सुरू होताच त्या पुन्हा घसरल्या.

MCX वर सोन्याच्या दर ५ डिसेंबरच्या एक्सपायरी रेटसह सोन्याचा भाव १,१८,६६५ प्रति १० ग्रॅम पर्यंत घसरला, जो मागील व्यापार दिवसाच्या बंद दिवसापेक्षा जवळजवळ २,००० ने कमी होता. यापूर्वी, बुधवारी, किंमत वाढली होती आणि प्रति १० ग्रॅम ₹१,२०,६६६ वर पोहोचली होती. केवळ सोनेच नाही तर चांदीच्या किमतीही गुरुवारी MCX वर घसरल्या. मागील व्यापार दिवशी, तो १.४६ लाखांच्या वर व्यवहार करत होता. पण गुरुवारी ट्रेडिंग सुरू झाले, तेव्हा त्यात १,६०० पेक्षा जास्त घसरण झाली आणि चांदीचा भाव ₹१,४४,४०२ प्रति किलोपर्यंत घसरला.

डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांनी दोन तासांहून अधिक काळ बंद दाराआड बैठक झाली. ज्यामध्ये अनेक प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांनी चीनवरील अमेरिकेचा कर कमी करण्यास सहमती दर्शविली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनवरील कर १०% ने कमी करून ५७% वरून ४७% केला जाईल अशी घोषणा केली. यासोबतच, त्यांनी सांगितले की दुर्मिळ पृथ्वी खनिजांचा प्रश्नही सोडवला गेला आहे, तर चीन देखील अमेरिकन सोयाबीन खरेदी करण्यास तयार आहे.

खर्डीतील खड्डेमुक्त रस्त्यासाठी दिव्यांग बांधवांचे आज ‘भीक मांगो’
निधी अभावी शहापूर-सापगाव-मुरबाड रस्त्याचे काम गेल्या आठ वर्षांपासून रखडले आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी गुरुवारी भीक मांगो आंदोलन करून प्रशासनाला निधीसाठी

मदत उपलब्ध करून देण्याचा इशारा दिव्यांग बांधवांनी दिला आहे.

शहापूर – सापगाव रस्ता एमएसआरडीसी अंतर्गत असून प्रशासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याचा चिखल झाला आहे. सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एखादा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पैशांची अडचण भासत असेल तर हातात लोटा घेऊन भीक मांगो आंदोलन करून पैशांची मदत करण्याचा इशारा एकल व्य दिव्यांग फाऊंडेशनने निवेदनाद्वारे तहसील दार, पोलीस निरीक्षक व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.