IND vs SA Kolkata Test – चार फिरकीपटूंसह टीम इंडिया मैदानात; साई सुदर्शनला डच्चू, तर ऋषभ पंतचं पुनरागमन
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेतील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या लढतीमध्ये हिंदुस्थानने अचंबित करणारा संघ निवडला असून गिल सेना तब्बल 4 फिरकीपटू घेऊन मैदानात उतरली आहे. तसेच डावखुरा फलंदाज साई सुदर्शन याची गच्छंती करण्यात आली असून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचे संघात पुनरागमन झाले आहे.
हिंदुस्थानचे अंतिम 11 खेळाडू –
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
आफ्रिकेचे अंतिम 11 खेळाडू –
एडन मार्करम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, तेंबा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (यष्टीरक्षक), सायमन हार्मर, मार्को यान्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज
A look at #TeamIndia‘s Playing XI
Updates
https://t.co/okTBo3qxVH#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/i7UcpmmkF7
— BCCI (@BCCI) November 14, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.

Comment List