देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय, गैरवापर होण्याचा धोका

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय, गैरवापर होण्याचा धोका

आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही आधार आवश्यक समजले जाते, परंतु देशात तब्बल सहा कोटी मृत झालेल्या व्यक्तींचे आधारकार्ड अजूनही सक्रिय आहेत, अशी माहिती समोर आली आहे. देशभरात आठ कोटींहून अधिक आधारकार्डधारकांचा मृत्यू होऊनही केवळ 1.83 कोटी आधारकार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत, तर उर्वरित सहा कोटी आधारकार्ड सक्रिय आहेत. यामुळे भविष्यात या आधारकार्डचा वापर करून बँकेची फसवणूक, बनावट खाती सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा गैरप्रकार होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) चे सीईओ भुवनेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडून 15.5 दशलक्ष मृत व्यक्तींचा डेटा मिळाला आहे. नोव्हेंबर 2024 ते सप्टेंबर 2025 दरम्यान यादीत अतिरिक्त 3.8 दशलक्ष व्यक्तींची भर पडली आहे. यापैकी 1.17 कोटी लोकांची ओळख पटवण्यात यश आले आहे. त्यांचे आधारकार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत. डिसेंबरच्या अखेरपर्यंत 20 दशलक्ष कार्ड निष्क्रिय होतील असा अंदाज प्राधिकरणाचा आहे, असे भुवनेश कुमार यांनी सांगितले आहे. 2016 पासून अंदाजे आठ कोटी आधारधारकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. जेव्हा आधार जारी करण्यास सुरुवात झाली तेव्हा देशात वार्षिक मृत्यूदर सुमारे 56 लाख होता. त्यानंतर हा आकडा 85 लाखांपर्यंत वाढला आहे. म्हणूनच 2016 पासून आम्ही 80 दशलक्ष मृत्यूंचा अंदाज लावत आहोत, असेही ते म्हणाले.

मृत्यूच्या माहितीसाठी पोर्टल

यूआयडीएआयने चार महिन्यांपूर्वी वेबसाईटवर मृत्यू माहिती पोर्टल सुरू केले आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याची माहिती कुटुंबाने या पोर्टलवर जाऊन भरणे आवश्यक आहे. यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे आधारकार्ड निष्क्रिय करण्यास मदत मिळेल, परंतु याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. चार महिन्यांत केवळ 3 हजार लोकांनी मृत व्यक्तींची माहिती यात भरली आहे. यापैकी 500 लोकांचे कार्ड निष्क्रिय करण्यात आले आहे.

  • या प्रक्रियेत 80 प्रकरणे उघडकीस आली, ज्यात मृत घोषित केलेले लोक नंतर जिवंत आढळले.
  • यूआयडीएआय डेटाबेसमध्ये नोंदवलेल्या 8.30 लाख आधारधारकांचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त.
  • 2 कोटी पेन्शनधारकांपैकी 2.2 दशलक्ष जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आरोग्यासाठी हा पांढरा पदार्थ आहे उत्तम पर्याय, निरोगी हृद्यासाठी सर्वोत्तम आरोग्यासाठी हा पांढरा पदार्थ आहे उत्तम पर्याय, निरोगी हृद्यासाठी सर्वोत्तम
सध्याच्या घडीला मखाना हा आरोग्यदायी पर्याय म्हणून अनेकांकडून सेवन केला जात आहे. मखाना हा एक अतिशय आरोग्यदायी नाश्ता म्हणून ओळखला...
मधुमेहींसाठी संजीवनी आहेत हे सुपरफूड्स, जाणून घ्या
हिवाळ्यात चाकवत खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
बिहार निवडणूक निकालावर संजय राऊत यांचं ट्विट, एकदम महाराष्ट्र पॅटर्न!
माझ्या मुलाने ते फोटो पाहिले तर… गिरीजा ओक स्पष्टच बोलली
प्रसिद्ध वृत्तपत्रात बातमी ऐवजी छापला ‘Prompt’, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Bihar election result 2025 – बिहारमध्ये चाललंय काय? राजदला मतं जास्त, पण जागा कमी; भाजप-जेडीयूला मतं कमी, पण जागा जास्त