फायनान्शियल प्लॅनिंगकडे दुर्लक्ष, पाच व्यक्तींमागे फक्त दोघांकडेच आपत्कालीन फंड
आर्थिक साक्षरता म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग करताना विमा साक्षरता व निवृत्तीनंतरचे नियोजन करताना शहरी आणि निमशहरी भागात राहणाऱ्या लोकांमध्ये जास्त फरक दिसत नाही. देशात पाच व्यक्तींपैकी केवळ दोन व्यक्तींकडे चार महिने पुरेल इतकाच आपात्कालीन निधी आहे, अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. देशभरात रेडी फॉप लाइफ इंडेक्सला शहरी लोकसंख्येनुसार, फायनान्शियल प्लॅनिंगसाठी 85 गुण असणे अपेक्षित आहेत, परंतु प्रत्यक्षात ही संख्या केवळ 59 गुण असल्याचे समोर आले आहे. यामुळे आपात्कालीन फंड जमा करण्याकडे अजूनही नागरिकांचे दुर्लक्ष आहे, असे दिसत आहे. एचडीएफसी लाइफने 10 नोव्हेंबरला यासंबंधीचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालासाठी मुंबई, दिल्लीसह विविध शहरांत 1800 हून अधिक लोकांची मते जाणून घेतली.
सर्वेक्षणातील महत्त्वाचे मुद्दे
उत्तर भारतात आपत्कालीन आणि निवृत्ती नियोजनामुळे तफावत 30 गुणांसह सर्वात जास्त आहे. पूर्व भारतात 20 गुणांसह तफावतीसह वास्तवादी स्व-मूल्यांकन आणि पारंपारिक व शिस्तबद्ध बचत दिसली. आर्थिक आणि आरोग्य नियोजनाबाबतीत दक्षिण भारत आघाडीवर आहे. पश्चिम भारतात गुंतवणुकीचा दृष्टिकोन वैविध्यपूर्ण आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List