उमेदवारी दाखल करा… थेट 2032 पर्यंत! जिंतुरात निवडणूक कार्यालयाच्या पत्राने संभ्रम
नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असताना निवडणूक विभागाकडून जारी केलेल्या एका अधिकृत पत्रकातील चुकांमुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पत्रकारांसाठी तयार केलेल्या निवडणूक ग्रुपवर पाठविण्यात आलेल्या निवडणूक अहवालात नामांकन दाखल करण्याच्या तारखाच चुकीच्या वर्षासह प्रसिद्ध झाल्या. या पत्रकात-2025ऐवजी 2026 ते थेट 2032पर्यंतच्या तारखा नमूद करण्यात आल्याने उमेदवार संभ्रमात पडले आहेत.
जिंतूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने माहिती पत्रकारांसाठी एक अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर 12 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये दाखल करण्याच्या तारखा 10/11/2025, 11/11/2026, 12/11/2027, 13/11/2028, 14/11/2029, 15/11/2030, 16/11/2031 आणि 17/11/2032 अशा नमूद केल्या आहेत. म्हणजेच पुढील 7 वर्षे उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार का, असा संतापजनक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List