Delhi Blast Case : दिल्ली स्फोटाप्रकरणी सुरक्षादलाकडून मोठी कारवाई, जम्मू कश्मीरमधून आणखी एक डॉक्टर ताब्यात

Delhi Blast Case : दिल्ली स्फोटाप्रकरणी सुरक्षादलाकडून मोठी कारवाई, जम्मू कश्मीरमधून आणखी एक डॉक्टर ताब्यात

दिल्ली स्फोट प्रकरणात जैश मॉड्यूलशी संबंधित दहशतवादी डॉक्टरांविरोधात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. काश्मीरमधून आणखी एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दहशतवादी डॉक्टरची ओळख कुलगाम जिल्ह्याचे रहिवासी डॉ. तजामुल अशी झाली आहे. तो श्रीनगर येथील एसएमएचएस रुग्णालयात नोकरी करत होता.

पोलिसांनी डॉक्टर तजामुलला करण सिंग नगर येथून अटक केली आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा आता त्याच्याकडून सखोल चौकशी करणार आहेत. याआधी मंगळवारी (11 नोव्हेंबर) जम्मू-कश्मीर पोलिसांनी पुलवामामधून एका डॉक्टरला ताब्यात घेतले होते, ज्याची ओळख सज्जाद अहमद मल्ला अशी झाली आहे. सज्जाद मल्ला हा दिल्ली स्फोटाचा मुख्य आरोपी आणि दहशतवादी डॉक्टर उमरचा मित्र असल्याचे समोर आले आहे.

कुलगाम पोलिसांनी बुधवारी (12 नोव्हेंबर) सांगितले की, बंदी घालण्यात आलेल्या संघटना जमात-ए-इस्लामी (JEI) विरोधात मोठ्या कारवाईचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील 200 हून अधिक JEI ठिकाणांवर छापे मारण्यात आले.

सोमवारी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर पोलिसांनी दहशतवाद्यांविरुद्ध मोहिम अधिक वेगाने राबवली आहे. आतापर्यंत दीड हजारहून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. जम्मू-कश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांविरोधात पोलिसांच्या पथकांनी खोर्‍यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तपासणी केली आहे.

जम्मू-कश्मीर पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये (POK) राहणारे जम्मू-कश्मीरचे रहिवासी आणि UAPA अंतर्गत आरोपांचा सामना करणाऱ्या व्यक्तींशी संबंधित मालमत्तांची तपासणी करण्यात आली आहे. लाल किल्ल्या जवळील स्फोटाच्या तपासात श्रीनगरमध्ये सापडलेल्या पोस्टरचा धागा या प्रकरणाशी जोडला जात आहे. हे पोस्टर श्रीनगरमधील नौगाम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातून जप्त करण्यात आले होते.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी शोपियां येथून मौलवी इरफान अहमद आणि गांदरबलच्या वाकुरा येथून जमीर अहमद नावाच्या व्यक्तीला अटक केली. सूत्रांच्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून दहशतवादी डॉक्टर अदीलला पकडण्यात आले. त्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग येथील एका रुग्णालयातून AK-56 रायफल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. त्याच साखळीत 8 नोव्हेंबर रोजी फरीदाबाद येथील अल-फलाह मेडिकल कॉलेजमधून शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वेट अँड वॉच, बिहार निवडणुकीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची सावध प्रतिक्रिया वेट अँड वॉच, बिहार निवडणुकीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची सावध प्रतिक्रिया
बिहार निवडणुकीत एक्झिट पोलचा काल हा एनडीएकडे वळताना दिसत आहे. पण हरयाणा निवडणुकीत वेगळेच चित्र होते असे विधान काँग्रेस अध्यक्ष...
Delhi Bomb Blast – ‘दावत के लिए बिर्याणी तैयार है’, स्फोट घडवण्यासाठी कोडवर्ड्सचा वापर
अमरावती: लग्नात नवरदेवाला चाकूने भोसकले; कॅमेरामॅनच्या ड्रोनने हल्लेखोरांचा २ किमीपर्यंत केला पाठलाग
सरन्यायाधीश गवईंवर बुट फेकल्याचे प्रकरण, दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी
पुन्हा नवी तारीख! शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणा संदर्भातील सुनावणी पुढे ढकलली
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरच्या घरी करा च्यवनप्राश, वाचा
40 वर्षीय व्यक्तीकडून लोकलमध्ये वकिल महिलेचा विनयभंग, पोलिसांत गुन्हा दाखल