गुप्तधन शोधणारे सहाजण अटकेत, पडक्या घरात खोदाई; राजूर पोलिसांची कारवाई

गुप्तधन शोधणारे सहाजण अटकेत, पडक्या घरात खोदाई; राजूर पोलिसांची कारवाई

एका जुन्या पडक्या घरामध्ये अघोरी प्रथा व जादूटोणा करून सोन्याची पेटीत असलेले  गुप्तधन शोधून देण्याचे काम करीत असलेल्या चार पुरुषांसह एका महिलेला राजूर पोलिसांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वंदना कलेक्शनसमोर गिरीश बोऱहाडे यांच्या पडक्या घरात काही लोक जादूटोणा करत असल्याची माहिती रविवारी (दि. 9) सायंकाळी राजूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला.

या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना बोऱहाडे यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत जेसीबी मशीन चालू अवस्थेत दिसले. चौकशीअंती बोऱहाडे यांनी सांगितले, तेथे पाण्याची टाकी बांधण्यासाठी खड्डा घेतला जात आहे. मात्र, घरात पाहणी केली असता, चार पुरुष व एक महिला बसलेली दिसून आली. त्यांच्यासमोर लिंबू, हळद, कुंकू, अगरबत्ती, गुलाबपाणी, काडीपेटी अशा जादूटोणा संबंधित वस्तू मिळून आल्या. शेजारच्या खोलीत खड्डा घेतलेला आणि माती उकरण्यासाठी लागणारे साहित्यही सापडले.

याप्रकरणी पोलीस शिपाई सुनील रत्नपारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राजूर पोलिसांनी गिरीश विनायक बोऱहाडे, सादिक बेग जाफर बेग (वय 35, रा. वाशिम), अनिकेत सुरेंद्र काळपांडे (वय 31, रा. अमरावती), नीलेश सुरेशराव रेवास्कर (वय 37, रा. वाशिम), विष्णू पाराजी हजारे (वय 74, रा. नाशिक) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, बोऱहाडे यांच्या सांगण्यावरून त्यांनी सोन्याची पेटी जमिनीत गाडलेली आहे, असा दावा करत जादूटोणा विधी सुरू केला होता. यासाठी त्यांनी बोऱहाडे यांच्याकडून 10 हजार रुपये घेतले असल्याचेही उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून सर्व जादूटोणा साहित्य जप्त केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Delhi Bomb Blast – फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलच्या मास्टरमाइंडने वैद्यकीय विद्यार्थ्यांचे केले ब्रेन वॉश, वाचा नेमकं काय घडलं Delhi Bomb Blast – फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलच्या मास्टरमाइंडने वैद्यकीय विद्यार्थ्यांचे केले ब्रेन वॉश, वाचा नेमकं काय घडलं
दिल्लीत सोमवारी कारमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला. देशाच्या तपास यंत्रणेसाठी मोठे आव्हान असताना आता दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचा मास्टरमाईंण्ड...
दिंडीत कंटेनर घुसला; महिला ठार, नऊ जखमी; संतप्त वारकऱ्यांचा रास्ता रोको
राज्य सरकारकडून तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 827 कोटी रुपयांचा निधी
ठाण्याच्या बाळकुममधील मतदारांची नावे गुजराती, तामीळ, कानडी भाषेत; त्वरित दुरुस्ती करा.. शिवसेनेचे निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन
घरातील फुलझाडांना घाला ‘या’ पद्धतीने खत, झाडांना येतील खूप सारी फुले
रायगडात 388 कुष्ठरुग्ण
पोलीस डायरी – पुण्यातील डोळस कुटुंब उद्ध्वस्त, बुवा व बायांपासून सावधान!