मी आता शांत बसणार! वॉरेन बफे यांचे सीईओ पद सोडण्याआधी पत्र
जगप्रसिद्ध गुंतवणुकदारांपैकी एक असलेले वॉरेन बफे हे या वर्षीच्या अखेरपर्यंत बर्कशायर हॅथवेचे सीईओ पद सोडणार आहेत. त्याआधी त्यांनी शेअरधारकांसाठी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लिहिले की, मी आता शांत राहणार आहे. कोणतेही मोठे पद स्वीकारणार नाही. बफे यांच्यानंतर ग्रेग एबेल हे पंपनीची सूत्रे स्वीकारणार आहेत. दरवर्षी आपण आपल्या मुलांसाठी आणि शेअरधारकांसाठी आभार मानणारे पत्र नक्की लिहू, असेही वॉरेन बफे यांनी पत्रात म्हटले आहे.
1965 पासून दरवर्षी बफे यांनी लिहिलेल्या वार्षिक पत्राला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या पत्रात केवळ वार्षिक अहवाल लिहिला जात नसे, तर जीवन दर्शन, गुंतवणूक आणि व्यावहारिक बुद्धिमतेची झलक दिसायची. आता बफे यांची ही परंपरा नवे सीईओ एबेल हे चालू ठेवतील. आपल्या अखेरच्या पत्रात बफे यांनी दान, वय आणि जीवनात काय काय शिकले, याचा भावनिक उलगडा केला आहे. आपल्या मृत्यूनंतर ते 149 अब्ज डॉलर किमतीचे शेअर दान करणार आहेत. मला अजूनही कळतंय की, मी हळू चालतो. काही वाचण्यासाठी थोडा वेळ घेतो, परंतु आठवडय़ात पाच दिवस नियमित कार्यालयात जातो. चांगल्या लोकांसोबत काम करतो. मला वाटते की, मी जिवंत असेपर्यंत बरीचशी संपत्ती माझ्या फाऊंडेशनने ती वितरित करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. 95 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बफे हे वय आणि आरोग्यावरही बोलले. पत्रात ते म्हणाले की, मी 95 वर्षापर्यंत जिवंत राहिल्याबद्दल नशिबाचा आभारी आहे आणि हैराणही आहे.
ग्रेग एबेल नवे सीईओ
बफेट यांचे उत्तराधिकारी म्हणून ग्रेग एबेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2000 पासून पंपनीशी जोडलेले आहेत. बफे यांनी म्हटले की, ग्रेग हे आमची पंपनी आणि कर्मचाऱ्यांना माझ्यापेक्षा जास्त ओळखतात. ते एक चांगले, मेहनती आणि विश्वासू संचालक आहेत. त्यांचे आरोग्य चांगले असावे आणि त्यांनी खूप वर्षांपर्यंत बर्कशायरचे नेतृत्व करावे, असे मला वाटते, असे बफे पत्रात म्हणाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List