धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून डिस्चार्ज
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर धर्मेंद्र यांचे कुटुंबीय त्यांना रुग्णालयातून घरी घेऊन गेले आहेत.
89 वर्षीय अभिनेते धर्मेंद्र यांना वयोमानानुसार प्रकृतीसंबंधी काही तक्रारी जाणवत असल्यामुळे त्यांना 31 ऑक्टोबरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आले. धर्मेंद्र यांचे कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित असून त्यांच्या मुलीदेखील अमेरिकेहून रवाना झाल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List