प्रदूषणामुळे दिल्ली-एनआरसीमध्ये ग्रॅप-3 लागू; पाचवीपर्यंतच्या शाळा आणि वर्क फ्रॉम होम बंद होणार
दिल्ली-एनआरसीमध्ये वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येमुळे ग्रॅप-3 लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत पाचवीपर्यंतच्या शाळा बंद केल्या जाऊ शकतात. तसेच कंपन्यांना वर्क फ्रॉम होम सांगितले जाऊ शकते. दिल्लीच्या आनंद विहार, पालमपासून लाल किल्ला, चांदनी चौकपर्यंत एक्यूआय लेव्हल 400 च्या वर पोहोचली होती. त्यानंतर एअर क्वालिटी व्यवस्थापन आयोगाने ग्रॅप-3 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या डिझेल वाहनांनाही दिल्लीत बंदी केली जाऊ शकते.
कशावर बंदी येईल?
तोडकाम, अनावश्यक बांधकाम व जुन्या डिझेल वाहनांवर बंदी.
सिमेंट, वाळूच्या ट्रकची वाहतूक बंदी.
दिल्लीबाहेरील किंवा आतील डिझेल बसवर निर्बंध.
इयत्ता पाचवीपर्यंतच्या शाळा बंद, ऑनलाईन अभ्यास.
स्टोन क्रशन आणि खोदकामसंबंधित कामांना बंदी.
इर्मजन्सी सेवा वगळून डिझेल जनरेटरवर बंदी
कंपन्यांना वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रीड मोडवर काम करण्याचा सल्ला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List