नायगाव बीडीडीवासीयांचा गृहप्रवेश लांबणीवर, नव्या तारखेची प्रतीक्षा
नायगाव बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 कुटुंबियांना नव्या घराचा ताबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बुधवारची तारीख निश्चित केली होती. त्यानुसार म्हाडाने तयारी केली. परंतु आता काही कारणात्सव चावी वाटपाचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे गृहप्रवेशासाठी रहिवाशांना मुख्यमंत्र्यांच्या नव्या तारखेची वाट पहावी लागणार आहे.
नायगाव बीडीडी येथील 42 चाळींचा पुनर्विकास करून 3344 रहिवाशांचे पुनर्वसन 20 पुनर्वसन इमारतींमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 8 तर दुसऱ्या टप्प्यात 12 पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारत क्र. 8 मधील टॉवर क्र. 4 ते 8 या पाच इमारतींचे काम पूर्ण झाले असून 864 कुटुंबियांना चावी वाटप करण्यासाठी म्हाडाने मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. मुख्यमंत्र्यांनी बुधवारची वेळ दिली होती, मात्र ही तारीख रद्द करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List