ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी
ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अकाउंट तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी येत्या 10 डिसेंबरपासून लागू केली जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील सरकारने यासंबंधीचे विधेयक मंजूर केले होते. या नव्या कायद्यामुळे आता ऑस्ट्रेलियातील 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरणे बंद होईल. या प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टिकटॉक, एक्स, यूटय़ूब, थ्रेड्स, रेडिट आणि किक यांचा समावेश आहे. या कायद्याचा उद्देश मुलांना ऑनलाइन हानिकारक सामग्री आणि सायबर धोक्यांपासून संरक्षण देणे आहे. या सोशल मीडिया बंदीमुळे 16 वर्षांखालील मुले वयोमर्यादा असलेल्या प्लॅटफॉर्मवर अकाउंट तयार करू शकणार नाहीत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना सुद्धा यासंबंधी कडक पावले उचलावी लागतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List