एक्झिट पोलमध्ये एनडीएची सरशी, बिहारमध्ये सत्ता कुणाची? शुक्रवारी निकाल
बिहार विधानसभा निवडणुकीचा दुसरा आणि शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. 17 पैकी 16 संस्थांच्या एक्झिट पोलमधून बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एनडीएला 155, तर महागठबंधनला 83 जागा मिळतील असा अंदाज आहे. दरम्यान, शुक्रवारी मतमोजणी असून तेव्हाच बिहारमध्ये सत्ता कुणाची, याचा फैसला होईल.
बिहार विधानसभेत 243 जागा आहेत. बहुमतासाठी 122 संख्याबळ हवे. भाजपला 75, जदयुला 67, राजदला 58 आणि काँग्रेसला 12 जागा मिळतील असा अंदाज आहे. जनसुराज्य पक्ष 4 ते 5 जागा जिंकू शकतो.
एका सर्व्हेत तेजस्वी सरकार
‘जर्नो मिरर’च्या एक्झिट पोलनुसार तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला 130 ते 140 जागांसह स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज आहे.
g दुसऱ्या टप्प्यात 69.04 टक्के इतके बंपर मतदान तर दोन्ही टप्पे मिळून विक्रमी 67 टक्के मतदान झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List